India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

रामायण यात्रा डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेन… त्यात आहेत या अत्याधुनिक सुविधा… नाशिक, नागपूरसह या ठिकाणांना भेटी…

India Darpan by India Darpan
March 16, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय रेल्वेने तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत गौरव डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेन, अर्थात पर्यटन रेल्वे गाडीच्या माध्यमातून, “श्री रामायण यात्रा” सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे यात्रा ७ एप्रिल २०२३ रोजी नवी दिल्ली इथल्या सफदरजंग रेल्वे स्थानकापासून सुरू होणार असून, या प्रवासात भगवान श्री रामाच्या जीवनाशी संबंधित प्रमुख ठिकाणांचा समावेश असेल.

ही प्रस्तावित रेल्वे यात्रा आधुनिक सुविधांनी युक्त भारत गौरव डिलक्स एसी टुरिस्ट रेल्वेने आयोजित केली जाईल. आतापर्यंत २६ भारत गौरव रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

स्टेट ऑफ आर्ट डिलक्स एसी टुरिस्ट रेल्वे गाडीमध्ये उत्तम भोजन सुविधा देणारी दोन उपहारगृहे, आधुनिक स्वयंपाकघर, डब्यांमध्ये शॉवर क्यूबिकल्स, फूट मसाजर यासह अनेक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. पूर्णपणे वातानुकूलित गाडीमध्ये फर्स्ट एसी आणि सेकंड एसी असे दोन प्रकारचे प्रवासी डबे असतील. गाडीतील प्रत्येक डब्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक, अशी सुरक्षा वैशिष्ट्ये उपलब्ध असतील.

बहुप्रतीक्षित रेल यात्रा, “श्री रामायणयात्रा” १७ रात्री /१८ दिवसांच्या प्रवासाला निघणार असून, अयोध्या, नंदीग्राम, सीतामढी, जनकपूर, बक्सर, वाराणसी, प्रयागराज, चित्रकूट, नाशिक, हम्पी, रामेश्वरम, भद्राचलम, नागपूर या महत्वाच्या ठिकाणांना भेट देऊन, ती नवी दिल्ली इथे परतेल.

देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या “देखो अपना देश” आणि “एकभारत श्रेष्ठभारत” या उपक्रमाच्या अनुषंगाने ही विशेष पर्यटक रेल्वे सेवा सुरू करण्यात आली असून, गाडीच्या 2AC वर्गासाठी रुपये १,१४,०६५/-, 1AC वर्गाच्या केबिन साठी रुपये १,४६,५४५/-, आणि 1AC कुपे साठी रुपये १,६८,९५०/- प्रति व्यक्ती या दराने शुल्क आकारले जाईल.

अधिक तपशीलांसाठी आपण IRCTC वेबसाइटला भेट देऊ शकता: https://www.irctctourism.com वेब पोर्टलवर प्रथम येणाऱ्याला प्राधान्य, या तत्त्वावर ऑनलाइन आरक्षण सेवा उपलब्ध आहे.

Union Ministers @kishanreddybjp and @AshwiniVaishnaw flagged off the Bharat Gaurav Tourist Train operating on the Ramayana Circuit from Delhi Safdarjung Railway Station on June 21.

TG Link: https://t.co/wJ7Ze44rUW pic.twitter.com/pTkcpFuFSn

— Prasar Bharati News Services & Digital Platform (@PBNS_India) June 22, 2022


Previous Post

तुमच्याकडे १० वर्षांपेक्षा जुने ट्रॅक्टर आहे? मग, आधी ही बातमी वाचा

Next Post

नाशिककरांनो, आता तुमच्या खिशावर पडणार थेट दरोडा; वाहतूक पोलिसांनी घेतला हा जबर निर्णय

Next Post

नाशिककरांनो, आता तुमच्या खिशावर पडणार थेट दरोडा; वाहतूक पोलिसांनी घेतला हा जबर निर्णय

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group