नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यात राजरोसपणे सुरू असलेला बनावट मद्य निर्मीतीचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाने उदध्वस्त केला. लखाणे ता. मालेगाव येथील वनविभागाच्या कार्यक्षेत्रास लागून असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हा कारखाना सुरू होता. या ठिकाणी देशी – विदेशी मद्याची भेसळ केली जात होती. या ठिकाणाहून पथकाने मद्यनिर्मीतीसाठी लागणारे साहित्य, विविध प्रकारचे बनावट मद्याने भरलेल्या व रिकाम्या बाटल्या तसेच मद्यवाहतूकीसाठी वापरण्यात येणारे पिकअप आणि दुचाकी असा सुमारे १४ लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लखाणे ता. मालेगाव येथील वनविभागाच्या कार्यत्रास लागून असलेल्या कारखान्यात बेकायदा दारूची निर्मिती केली जात असल्याची माहिती मालेगाव विभागाच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.१०) पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. जंगलास लागून असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदा देशी व विदेशी दारूची भेसळ करण्यात येत होती. घटनास्थळावरून बनावटीकरण करण्यासाठी लागणारे साधनसाहित्यासह पथकाने विविध प्रकारचे बनावट मद्याने भरलेल्या व रिकाम्या बाटल्या, बुचींग मशीन तसेच मद्यवाहतूकीसाठी वापरण्यात येणारे एमएच १८ ए ३६८० मालवाहू पिकअप आणि एमएच ०८ एआर ६४१८ दुचाकी असा सुमारे १४ लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी मद्य निर्मीती करणा-यासह पुरवठादार व खरेदीदार तसेच वाहन मालक आणि ज्ञात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आयुक्त डॉ.राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त उषा वर्मा व अधिक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगावचे निरिक्षक लिलाधर पाटील, दुय्यम निरीक्षक सागर नलवडे, रियाज शेख कळवणचे निरीक्षक सी.एच.पाटील,आर,जे,पाटील दुय्यम निरीक्षक मनिष पाटील तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक वंदना देवरे,जवान दिपक गाडे,शाम पानसरे,प्रविण अस्वले,दिगंबर पालवी,आण्णा बहिरम,गोकुळ परदेशी,राकेश पगारे, अमित गांगुर्डे, राजाराम सोनवणे, योगेश म्हस्के,गणेश शेवगे,अनिल जाधव,राजेंद्र चव्हाणके,संतोष बोराडे,संजय शिंदे आदींच्या पथकाने केली.
………..