नाशिक : शालिमार भागात कपडे खरेदी करीत असतांना महिलेच्या पर्समधील रोकडसह दागिण्यांवर चोरट्यांनी ९६ हजाराचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता रावसाहेब देशमुख (४० रा.श्रमिकनगर,सातपूर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. देशमुख या रविवारी खरेदीसाठी मेनरोड भागात आल्या होत्या. शालिमार चौकात त्या हातगाड्यावर कपडे खरेदी करीत असतांना ही घटना घडली. गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी पर्समधील एक हजार रूपयांच्या रोकडसह सोन्याचे गंठण असा सुमारे ९६ हजाराचा ऐवज हातोहात लांबविला. अधिक तपास पोलीस नाईक काठे करीत आहेत.