नाशिक – अंबड पोलिसांची कारवाई, १ लाख ६८ रुपयाचे वेगवेगळे मोबाईल फोन जप्त
नाशिक : अंबड पोलिसांनी पाच संशयीतांना गजाआड करुन या संशयीताच्या ताब्यातून ७० हजाराचा ऐवज जप्त केले आहे. या जप्त करण्यात आलेल्या ऐवजमध्ये सोने, चांदीचे दागिन्याचा समावेश आहे. या कारवाई पाठोपाठ अंबड पोलीसांनी दुसरी मोठी कारवाई केली आहे. यात तीन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी सुरज नामदेव गायकवाड (वय २१ रा निनावी पो पिंपळगांव डुकरा , ता ईगतपुरी ) प्रथम राजेश छाजेड (वय १ ९ काठेगल्ली ) सपोनि गणेश शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचून वरील संशयित आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्याकडून पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे ६ मोबाईल फोन जप्त करण्यात आले सदर आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत अंबड लिंक परिसरात राहणारे इरशाद रईस शहा, (वय २३ ) यांचा मोबाईल फोन बळजबरीने खेचून नेला होता या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस त्याचा तपास करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीची आधारे संशयित आरोपी समाधान देविदास निकम (, वय २६ रा . अशोकनगर , सातपुर ), याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडुन १,६८,००० रूपये किंमतीचे वेगवेगळे मोबाईल फोन जप्त करण्यात आले सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि श्रीकांत निंबाळकर स पो गणेश शिंदे , प्रशांत नागरे,चंद्रकांत गवळी , अनिरूध्द येवले , नितीन सानप , हेमंत आहेर , मच्छिंद्र वाकचौरे , जनार्दन ढाकणे , राकेश राउत , प्रमोद काशिद , योगेश शिरसाठ , मुकेश गांगुर्डे यांच्या पथकाने केली.