नाशिक – पाथर्डी फाटा परिसरातील शोरूममधून दोन इलेक्ट्रीक मोटारसायकली चोरणा-या चोरट्याला पोलिसांनी गजाआड केले आहे. या चोरटयाच्या ताब्यातून चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने केली आहे. फिरोज आयुब शेख (रा.जाखोरी ता.जि.नाशिक) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
या चोरट्याने घराच्या पत्र्याच्या पडवीत दोन इलेक्ट्रीक ठेवल्या होत्या. या आरोपीला अटक केल्यामुळे अंबड पोलीसांचा गुन्हा उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेने अंबड पोलीसांच्या स्वाधिन या चोरट्याला केले आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक डॉ.अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कुंदन सोनोने, धर्मराज बांगर,जमादार विजय शिरसाठ,हवालदार गंगाधर केदार,शेरखान पठाण,श्रीराम सपकाळ,किशोर देसले,सुहास क्षिरसागर,आनंदा काळे,दिपक पाटील,गणेश वाघ,दशरथ निंबाळकर व शिपाई विजय बनकर आदींच्या पथकाने केली.