नाशिक – पंचवटी परिसरातील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठासमोर पावणे आठच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोघांनी शस्त्राचा धाक दाखवून चारचाकी आडवित चारचाकीतील ६४ डुक्कर पळवून नेली. याप्रकरणी दोन दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेली माहीती अशी मालाड पूर्व भागातील करण संजय चंडालिया (वय २०, झिलू धोबी चाळ, चिंचोली फाटा मालाड) हा नाशिक जिल्ह्यातून डुक्कर वाहातूक करता दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी सुरगाणा येथून तो त्याची महिंद्रा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या पिकअप (एमएच ४७ वाय ६७६०) गाडीतून २२५० किलोचे ६४ डुक्कर घेऊन गाडीतून चालक संदीप जाधव आणि त्याचा मित्र तुषार लूखड हे सगळे दिंडोरी जात असतांना शुक्रवारी (ता.१०) सायंकाळी पावणे आठच्या सुमारास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठासमोर आपची दुचाकी (एमएच १५ सी ८८१७) आणि निळ्या रंगाची स्प्लेंडर अशा दोन दुचाकीवर आलेल्या दोघांनी पिकअप गाडीला दुचाकी आडवी लावून हटकले त्यानंतर तू आम्हाला कट का मारला अशी विचारणा करीत, त्यांच्याशी हुज्जत घातली त्यानंतर चालकाला मारहाण करीत त्यांच्या गाडीतील ६४ डुक्कर बळजबरीने घेउन गेले. याप्रकरणी करण चंडालिया याच्या तक्रारीवरुन म्हसरुळ पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.