नाशिक : अल्पवयीन मुलीचा नराधम बापानेच विनयभंग केल्याची घटना पारिजात नगर येथे घडली. मुलीने आपबिती आपल्या आईकडे कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून पत्नीने जाब विचारल्याने संतप्त नव-याने तिलाही बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेंजमीन पेतरस खरात असे संशयीताचे नाव आहे. खरात बापलेक आपल्या घरात एकटे असतांना संशयीताने पोटच्या मुलीवर बळजबरी करून विनयभंग केला. मुलीने कशीबशी सुटका करून घेतल्यानंतर घरी परलेल्या आईला आपबिती कथन केली. आईने नव-याला जाब विचारला असता त्याने पत्नीस शिवीगाळ व दमदाटी करीत बेदम मारहाण केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक प्रविण सुर्यवंशी करीत आहेत.