नाशिक : आई ही मुलांसाठी जीवाची बाजी लावण्यास तयार असते. मात्र एका आईने तर प्रियकरास हाताशी धरून दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण केले आहे. वारंवार पोलीसांना सांगुनही लक्ष दिले जात नसल्याने अखेर न्यायालयाच्या आदेशान्वये त्या आई व प्रियकरा विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चेहडी पंपिगरोड परिसरातील रहिवासी प्रशांत रणशिंगे व पुनम यांचा विवाह बारा वर्षा पूर्वी झाला होता. त्यांना दहा वर्षांचा एक मुलगा आहे. संसार सुरळीत चालू असतांना पुनम ही छोट्या कारणा वरूनही प्रशांतशी भांडण करू लागली होती. तर तासनतास कोणाशी तरी फोनवर बोलत असायची. संशयावरून मोबाईल तपासला असता विशाल गिते नाव दिसले. आक्षेपार्ह मेसेजही दिसले. भांडण झाल्याने पुनमने अनैतिक संबध असल्याचे मान्य केले. नातेवाईकांना बोलावुन समजावुन यापुढे असे करणार नाही. व्यवस्थित संसार करेल असे हमीपत्र लिहून तशी नोटरीही केली. मुलाचा विचार करता संसार सुरळीत सुरु झाला .
मात्र गेल्या १५ नोव्हेंबर रोजी प्रशांत कामावर गेला दुपारी आला असता मुलगा श्रवण हा खेळण्यासाठी गेला तर वर आलाच नसल्याचे दिसले. पुनमही गायब होती व तीचा फोन बंद होता. आजुबाजुला चौकशी केली असता एक इसम मुलाला घेऊन गेल्याचे समजले. घरातील कपाट तपासल असता कपाटातील रोख रक्कम एक लाख सत्तर हजार व सोन्याचे दागीने लंपास झालेले दिसले. पैशांसाठी हे मुलाला मारू शकतात. म्हणून पोलीसात धाव घेतली. मात्र काही उपयोग झाला नाही. शेवटी प्रकरण न्यायालयात गेल्याने अखेर पुनम प्रशांत रणदिवे व विशाल चंद्रभान गिते रा . गिते मळा चेहडी शिवार यांच्या विरोधात भादवी कलम ३६४ अ ,३६३ , ३७९ , ४९७ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.