सिडकोत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक : पाणीपुरी विक्री व्यवसाय करणा-या अल्पवयीन मुलीचा एकाने विनयभंग केल्याची घटना सिडकोत घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली आहे. महिला आपल्या घरासमोरच पाणी पुरी विक्रीचा व्यवसाय करते. बुधवारी (दि.१७) रात्री महिला घरात जेवन करीत असतांना तिची पीडित अल्पवयीन मुलगी व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली. काऊंटरवर आलेल्या अनोळखी तरूणाने मुलीचा विनयभंग केला. या वेळी मुलीने आरडाओरड केलली असता आई व लहान भाऊ तिच्या मदतीला धावून आले. यावेळी आईने अनोळखी संशयीतास जाब विचारला असता त्याने भावास लोटून देत तसेच कुटूंबियास शिवीगाळ करीत काऊंटरवर दगड फेकून मारत पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक संदिप पवार करीत आहेत.
उघड्या घरात शिरून दागिणे चोरी
नाशिक : बांधकाम साईटवरील वॉचमनच्या उघड्या घरात शिरून चोरट्यांनी दागिणे व मोबाईल चोरून नेला. ही घटना गोविंदनगर भागात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर उध्दवराव घाटूळ (रा.भावसार भवन शेजारी गोविंदनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. घाटूळ कुटुंबिय भावसार भवन जवळील नव्याने सुरू असलेल्या बांधकाम साईटवर राहतात. बुधवारी (दि.१७) कुटूंबिय आपआपल्या कामात व्यस्त असतांना अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात शिरून मोबाईल व कानातील सोन्याचे कुडके असा सुमारे ८ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलीस नाईक सुनिल बहिरम करीत आहेत.