अल्पवयीन मुलीचा विनयभंग; इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक : घरात कुणी नसल्याची संधी साधत एकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना मातोश्री चौकात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवि किसन भगत (१९ रा.गोविंदनगर) असे संशयीताचे नाव आहे. बाधकाम साईटवर वास्तव्यास असलेल्या पिडीतेच्या आईने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयीत आणि पिडीतेचे कुटूंबिय एकमेकांचे परिचीत असून तो सोमवारी (दि.१५) पिडीतेच्या घरी गेला होता. घरात कुणी नसल्याची संधी साधून मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणून त्याने पिडीतेशी अंगलट करून विनयभंग केला. अधिक तपास महिला उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.
…….
शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच; दोघा तरूणांची आत्महत्या
नाशिक : शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून बुधवारी (दि.१७) वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोघा तरूणांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड आणि पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
सिडकोतील सारंग राजेंद्र कासार (२५ रा.स्वामी विवेकानंदनगर) या युवकाने बुधवारी आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना मोबाईलवरील स्टेटसच्या माध्यमातून उघडकीस आली असून, परिसरातील बाळकृष्ण अत्तरदे यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत. दुसरी घटना पंचवटीतील कृष्णनगर भागात घडली. करण शशिकांत कटारे (२१ रा.परिवार सोसा.कृष्णनगर) या युवकाने बुधवारी त्याच्या राहत्या इमारतीच्या दुस-या मजल्यावरील स्लॅबला असलेल्या पंख्याच्या हुकास साडी बाधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक खाजेकर करीत आहेत.