नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोसह परिसरात दहशत माजवणाऱ्यांची सोमवारी पोलिसांनी धिंड काढत त्यांना चोप दिला. त्यामुळे दहशत माजवणा-यांना चांगलीच चपराक बसली आहे. दोन दिवसांपूर्वी महालक्ष्मी चौकातील राजदत्त नगर भागात हातात धारदार शस्त्र घेत दहशत पसरणाऱ्या गुंडांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. या घटनेत जुन्या वादावरुन कुरापत काढत एका युवकाला १० ते १५ जणांच्या टोळक्याने हातात धारदार शस्त्रे, तलवार, लाकडी दांडके घेऊन रस्त्याने शिवीगाळ करत धमकावले होते. त्यानंतर युवक गुंडांपासून वाचविण्यासाठी एका घरात लपल्याने सुदैवाने त्याचे प्राण वाचले. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होती. अंबड पोलिसांनी दोन्ही गटांमधील दहा संशयितांना अटक करुन त्यांना नंतर चांगलाच धडा शिकवला.