नाशिक – तिडके कॉलनीत साडेतीन लाखाची घरफोडी

प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो
तिडके कॉलनीत साडेतीन लाखाची घरफोडी
नाशिकः उघड्या दरवाजातून प्रवेश करून चोरट्यांनी कपाटातून साडेतील लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना २५ मे ते ५ जुन दरम्यान घडली. याप्रकरणी प्रफ्फुल पुनमचंद जैन (रा. प्रथमेशनगर, तिडके कॉलनी ) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार २५ मे ते ५ जुन दरम्यान जैन यांच्या आत्या चंदाबाई जैन या घरात झोपलेल्या असताना उघड्या दरवाजातून प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी कपाटाचे लॉक उघडून त्यातील ३ लाख ५० हजार रूपये किंमतीचे १७५ ग्रॅम वजनाचे दागिणे चोरून नेले. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक पाटील करत आहेत.

….

वृद्धेचे मंगळसुत्र हिसकावले
नाशिकः रस्त्याने पायी जाणार्‍या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी (दि.८)रासबिहारीरोड ते गोरक्षनगर रस्त्याच्या मैदानाजवळ घडली. याप्रकरणी चंद्रकला जयंतीलाल वाणी (६५, रा. सुर्यशक्ती अपा. गोरक्षनगर, म्हसरुळ) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मंगळवारी रात्री वाणी या औषधे खरेदी करून घराकडे परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रूपये किंमतीचे एक तोळा वजनाचे मंगळसुत्र हिसकावून पळ काढला. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक भडीकर करत आहेत.

टेम्पोच्या धडकेत एक ठार
नाशिकः भरधाव आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी (दि.८) दुपारी एक्स्लो पॉईंट येथे घडली. भाऊसाहेब बाबुराव शिंदे (४०, रा. श्रीमिकनगर, सातपुर) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पाठिमागुन भरधाव आलेल्या आयशर टेम्पोने दोन दुचाकींना धडक दिली. यामध्ये एका दुचाकीवरील शिंदे हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर दुसर्‍या दुचाकीवरील भिमा महादु नवले (३८, रा. दत्तनगर, चुंचाळे शिवार) हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आयशर चालक पांडुरंग हनुमंत कांबळे (४०, रा. भोर टाऊनशिप, अंबड) यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक बेडवाल करत आहेत.