सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धक्कादायक! सुनेचे शीर घेऊन महिला आली पोलिस ठाण्यात; परिसरात उडाली एकच खळबळ

by India Darpan
ऑगस्ट 22, 2022 | 5:12 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आंध्र प्रदेशातून एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने स्वतःच्या सुनेची हत्या केली आणि छेडलेले शीर घेऊन शरण येण्यासाठी पोलिस स्टेशन गाठले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा मुलगा मरण पावला आहे आणि तिच्या सुनेचे दुसऱ्या पुरूषाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे रागाच्या भरात तिने हे कृत्य केले.

आपल्या सुनेचे कापलेले शीर घेऊन एक महिला पोलीस ठाण्यात आली. आंध्र प्रदेशातील अन्नमय जिल्ह्यातील ही घटना आहे. यासंदर्भात  पोलिसांनी सांगितले की, महिलेचे नाव सुब्बम्मा असून ती रायचोटी नगरपालिका हद्दीतील कोठाकोटा रामापुरम भागातील रहिवासी आहे. संपत्तीच्या वादातून आपण आपली सून वसुंधरा हिची हत्या केल्याची कबुली या महिलेने दिली आणि त्यामुळे ती पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करण्यासाठी आली होती.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, मृत महिला आणि तिची आरोपी सासू हे दोघे एकाच घरात राहत होते. मृत महिलेला दोन मुली असून पतीचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेचे मल्ली नावाच्या व्यक्तीशी अनैतिक संबंध आहेत. त्यामुळे कुटुंबात अनेक गोष्टी सुरू होत्या. त्याने पुढे स्पष्ट केले की, आरोपी सुब्बम्मा हिला सून वसुंधरा (वय ३५) हिचे दुसर्‍या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता आणि वसुंधरा कुटुंबाची मालमत्ता तिच्या नावावर करेल याची सासूला भिती होती. त्यामुळे आपल्या नातवंडांवर अन्याय होईल, अशी भीती त्यांना वाटत होती.

त्याचवेळी, नुकतेच सासू आणि सून यांच्यात खूप भांडण झाले, त्यामुळे आरोपी महिला चांगलीच संतापली आणि योग्य संधीची वाट पाहू लागली आणि योग्य संधी मिळताच तिने सुनेचा खून करून तिचा शिरच्छेद केला. आरोपी महिलेला आपली सून आपल्यावर हल्ला करेल अशी भीती वाटत होती, त्यामुळे तिने आधीच आपल्या सुनेची हत्या केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Crime Mother in Law Come in Police Station with Head of Daughter in Law
Andhra Pradesh Murder

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्र सरकार मोबाईल ग्राहकांना देणार हा मोठा दिलासा

Next Post

पुणेकरांनो सावधान! या सर्वेक्षणाचा निष्कर्ष बघा काय सांगतोय

Next Post
pune home

पुणेकरांनो सावधान! या सर्वेक्षणाचा निष्कर्ष बघा काय सांगतोय

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

मे 18, 2025
INDIA GOVERMENT

बांगलादेशमधून भारतात या वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

मे 18, 2025
court 1

एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सुनावली ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 18, 2025
shivaji

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011