नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्याच्या धावपळीच्या काळात अनेक नोकरदार वर्ग घरचा डबा नेण्याऐवजी बाहेरचेच जेवण मागवतात तसेच अविवाहित तरूण, नोकरी करणाऱ्या तरुणी, एकटे राहणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, बाहेरगावी राहणारे युवक व हॉस्टेलवर विद्यार्थी अशा सर्वांना जेवणासाठी घरचा डब्बा मिळणे शक्यच नसते किंवा स्वतः स्वयंपाक करता येणे देखील शक्य नसते, त्यासाठी मग बाहेरून काहीतरी ऑर्डर देऊन मागविले जाते.
सध्याच्या कोरोना काळात तर ऑनलाइन पद्धतीनेच जेवणाची होम डिलिव्हरी करण्यात येते यात स्वॉगी किंवा झोमॅटो सारखे सेवा देणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांचे डिलिव्हरी बॉय तात्काळ तुमच्या आवडीचे जेवण किंमत पदार्थ घेऊन तुमच्या दारात हजर असतात, परंतु त्यात अनेक वेळा गैरप्रकार देखील होत असल्याचे उघड झाले आहे.
नवी दिल्लीमध्ये असाच प्रकार घडला अन्नपदार्थांची डिलिव्हरी करणाऱ्या पदार्थ पोहोचते करून संबंधित ग्राहकांकडून पैसे घेतलेच परंतु ते पैसे संबंधित कंपनीला जमा केले नाही, असा हा सर्व प्रकार जवळजवळ सहा महिने सुरू होता. ग्राहकांला डिलिव्हरी केलीच नाही अशी कारणे हे डिलिव्हरी बॉय देत होते, अखेर हा प्रकार उघडकीस आले आणि या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे
दिल्लीच्या सायबर पोलिसांनी ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीकडून चार लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही तरुण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात आणि ऑर्डर रद्द करून सहा महिन्यांसाठी कंपनीची फसवणूक करत होते. शॅडोफेक्स टेक्नॉलॉजी कंपनीच्या वतीने ७ जानेवारीला तक्रार देण्यात आली होती. कंपनीने सांगितले होते की ती ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी Zomato आणि Swiggy ला डिलिव्हरी बॉय पुरवते.
यामध्ये डिलिव्हरी बॉय त्याच्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डरची रक्कम जमा करतो आणि नंतर ती फॉरवर्ड केली जाते. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डरवर कंपनीचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे. डिलिव्हरी बॉयच्या सिमवरून पार्टनर आयडी तयार केला जातो. पण फसवणुकीत वापरलेला पार्टनर आयडी बनावट कागदपत्रांवर जारी केलेल्या सिमवर बनवला होता.
याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर आरोपींनी कबूल केले की, ते दोघे दुसऱ्याच्या नावाने जारी केलेल्या सिमकार्डवरून कंपनीचा पार्टनर आयडी घेत असत. त्यानंतर 10 ऑर्डर योग्यरित्या वितरित झाल्यानंतर आयडी नियमित करण्यात आला. त्यानंतर दोन्ही तरुण प्रीपेड ऑर्डरचा माल इतरत्र विकायचे. कंपनीच्या वतीने तो कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डरची रक्कम स्वतःच्या खिशात ठेवायचा. एकाच आयडीवर दोन ते तीन दिवस काम केल्यानंतर तो बंद करून दुसरे सिम रजिस्टर करायचे, हा गैरप्रकार सुमारे सहा महिने सुरु होता.