इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लोक देवाकडे नवस बोलतात. त्यांना अपेक्षित यश मिळालं की ते देवात येऊन नवस फेडतात. कुणी गावभोजन करू म्हणतात, कुणी सोनं देऊ म्हणतात… प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे देवाला नवस बोलतो. पण नवस पूर्ण झाला नाही म्हणून एकानं चक्क मंदिराची तोडफोड केली, तर दुसरीकडे एका मंदिरात नवस फेडण्यासाठी नकली सोने-चांदी देत असल्याचे उघडकीस आले आहे.
नकली दागिण्यांची कहाणी महाराष्ट्राच्या दैवताच्या पायाशी उघडकीस आली आहे. पंढरपुरात विठुरायाच्या चरणी अनेक लोक नवस फेडण्यासाठी दागीणे टाकतात. सोने-चांदीचा यात मोठ्या प्रमाणात समावेश असतो. मंदिर व्यवस्थापनाने या दागीण्यांची छाननी करण्यासाठी विशिष्ट्य लोकांकडे जबाबदारी दिली आहे. ही मंडळी छाननी करून त्याची नोंदणी करून घेतात. अश्यात बहुतांश प्रमाणात लोक नवस फेडताना नकली सोने-चांदी देवाला वाहात असल्याचं निदर्शनास आलं आहे. चांदीच्या धातूसारख्या दिसणाऱ्या वस्तूंमध्ये पाळणे, घोडे, डोळे, निरांजन, हळदी-कुंकवाचे तबक, पैंजण आदींचा समावेश आहे. तर सोन्यासारख्या दिसणाऱ्या वस्तूंमध्ये कानातील दागीणे, नथ, मंगळसूत्र यांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. आता भक्तांनी नकली दागीणे टाकले असले तरीही मंदिर व्यवस्थापनाला ते जतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे ते जतन केलं जातं. पण, त्यांचे मोजमाप होत नाही. असे नकली दागीणे मोठ्या प्रमाणात मंदिर व्यवस्थापनाकडे आहे.
देवाला बेन्टेक्स दागिने
खरं तर सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे कोणताही भक्त आपल्या आर्थिक क्षमतेनुसारच देवाला दागीणे अर्पण करू शकतो. पण ज्यावेळी छाननी करण्यात येते त्यावेळी त्यामध्ये बेन्टेक्सच्या वस्तूंच्या संख्या सर्वाधिक असल्याची बाब उघडकीस आली आहे.
नवस पूर्ण झाला नाही म्हणून तोडफोड
मध्यप्रदेशमधील इंदौर शहरात एका तरुणाने देवाला नोकरीसाठी नवस केला. पण दुर्दैवाने त्याला नोकरी लागली नाही. मग त्यानं येऊन गाऱ्हाणे गावे किंवा देवाववर विश्वास ठेवू नये, असेच काहीतरी अपेक्षित आहे. पण त्या तरुणाने नवस पूर्ण झाला नाही म्हणून रागामध्ये चक्क मंदिराची तोडफोड केली. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आणि त्या तरुणाला अटकही करण्यात आली. शुभम कैथवास नावाच्या या तरुणाने पोलिसांना सांगितले की, ‘मी रोज देवाला आपली समस्या सांगायचो, इतरांच्या समस्या देवाने सोडवल्या माझ्या सोडवल्या नाही. म्हणून मी तोडफोड केली.’
Crime Bhakta Fake Jewelry and Vandalized Temple