सोमवार, नोव्हेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

तब्बल ४ वर्षांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात वनडे सामना… कोण वरचढ… असा आहे आजवरचा इतिहास…

सप्टेंबर 2, 2023 | 12:18 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
F4 73hIawAEYE 9 e1694164089856

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत आणि पाकिस्तान चार वर्षांनंतर वनडे फॉरमॅटमध्ये आणि पाच वर्षांनंतर एकदिवसीय आशिया कपमध्ये भिडणार आहेत. हे दोन संघ यापूर्वी २०१८ मधील एकदिवसीय आशिया चषक आणि चार वर्षांपूर्वी २०१९ विश्वचषक स्पर्धेत एकदिवसीय फॉर्मेटमध्ये एकमेकांशी भिडले होते. या आधीच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर आपले वर्चस्व निश्चितपणे नोंदवले होते, परंतु शनिवारी जेव्हा हे दोन संघ पुन्हा एकदा आशिया चषक स्पर्धेत आमनेसामने येतील तेव्हा गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत परिस्थिती वेगळी असेल.

भारताला पूर्वीप्रमाणे कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची साथ मिळाली तर शाहीन आफ्रिदीला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानकडे नसीम शाह आणि हरिस रौफसारखे गोलंदाज असतील. शनिवारी होणाऱ्या या सामन्यात भारताचे स्टार फलंदाज आणि पाकिस्तानचे घातक वेगवान गोलंदाज यांच्यात रंजक सामना होणार आहे.

मेलबर्न येथे झालेल्या टी२० विश्वचषकादरम्यान भारत आणि पाकिस्तान शेवटचे एकमेकांशी खेळले होते, जिथे विराट कोहलीने हॅरिसच्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला होता. पाकिस्तानविरुद्धचा सामना कोणताही असो, विराट कोहली खास तयार असतो. जर तुम्हाला पाकिस्तानी गोलंदाजांचा सामना करायचा असेल तर तुम्हाला तुमची सर्वोत्तम फलंदाजी दाखवावी लागेल, असेही त्याने म्हटले आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या मागील तीन टी20 सामन्यांमध्ये विराटने ३५, ६० आणि ८२ धावांची इनिंग खेळली आहे. आताही त्याच्या बॅटवर पाकिस्तानी गोलंदाजांची विशेष नजर असेल.

𝗠𝗔𝗧𝗖𝗛 𝗗𝗔𝗬! 🏟️

India 🆚 Pakistan

📍 Kandy, Sri Lanka

𝘼𝙇𝙇 𝙄𝙉 𝙍𝙀𝘼𝘿𝙄𝙉𝙀𝙎𝙎 for our first game of #AsiaCup23! 👏 👏#TeamIndia pic.twitter.com/LrRbeQjTH3

— BCCI (@BCCI) September 2, 2023

हा सामना जिंकण्यासाठी भारताला कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्याकडून चांगल्या सुरुवातीची आशा करावी लागेल. तथापि, हे सोपे नाही. शाहीन, नसीम आणि रौफ यांच्या वेगात भारतीय जोडीला पूर्ण संयम ठेवावा लागेल. या गोलंदाजांसमोर रोहित आणि गिल या दोघांच्या तंत्राचीही कसोटी लागणार आहे. ऑस्ट्रेलियन दिग्गज मॅथ्यू हेडननेही सांगितले आहे की, रोहित शर्माला शाहीन आफ्रिदीविरुद्धच्या पहिल्या तीन षटकांमध्ये जास्त काळजी घ्यावी लागेल. २०२१च्या टी२० विश्वचषकात, रोहितला शाहीनने त्याच्या केळी स्विंगने (इनकमिंग बॉल) लवकर बाद केले. गिलला त्याच्या फूटवर्कचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

पावसाचे सावट
श्रीलंकेच्या हवामान खात्यानुसार, शनिवारी पल्लेकेलेमध्ये ढगाळ वातावरण आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. मग पल्लेकेलेची विकेटही वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरते. अशा परिस्थितीत पाकिस्तानी आणि भारतीय वेगवान गोलंदाजांना अशी परिस्थिती आवडेल. ईशान किशन संघात असेल, मात्र त्याची फलंदाजी निश्चित झालेली नाही. त्याने आजपर्यंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केलेली नाही आणि मधल्या फळीत त्याची सरासरी २२.७५ आहे.

India and Pakistan players enjoy light-hearted moments during their final practice session before the Asia Cup showdown. pic.twitter.com/HSdeMxmASO

— ICC (@ICC) September 2, 2023

पल्लेकेले येथील परिस्थिती पाहता रोहित शनिवारी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या यांना एकत्र मैदानात उतरवू शकतो. रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकत असल्याने तो फिरकीपटू म्हणून खेळणार आहे. रोहित फलंदाजीत सखोलतेसाठी अक्षर पटेलला संधी देतो की कुलदीप यादवला आजमावतो हे पाहायचे आहे. कुलदीपने यावर्षी 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 22 बळी घेतले आहेत, तर अक्षरने तीन सामन्यांत सहा विकेट्स घेतल्या आहेत.

असा आहे इतिहास
सहा वर्षांपासून भारत एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध हरलेला नाही. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत त्याचा शेवटचा पराभव झाला होता. त्यानंतर भारताने आशिया कप २०१८ मध्ये आणि एकदा विश्वचषक २०१९ मध्ये पाकिस्तानला दोनदा पराभूत केले आहे. गेल्या १० सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर भारताने सात सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने तीन सामने जिंकले आहेत. २०१४ मध्ये झालेल्या एकदिवसीय आशिया चषकात भारताला पाकिस्तानकडून शेवटचा पराभव पत्करावा लागला होता.

Cricket Asia Cup India Pakistan ODI Match History

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्रीय मंत्री भारती पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र… केली ही मागणी…

Next Post

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक… असे झाले ते कर्जबाजारी… तब्बल ५३८ कोटींचे मनी लाँड्रिंग प्रकरण…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
Naresh Goyal

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक... असे झाले ते कर्जबाजारी... तब्बल ५३८ कोटींचे मनी लाँड्रिंग प्रकरण...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011