India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

विराट कोहलीचा धडाका सुरूच; ठोकले आणखी एका शतक, रचला हा इतिहास

India Darpan by India Darpan
January 15, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. कर्णधार रोहितचे अर्धशतक हुकले, पण शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी उत्कृष्ट शतकी खेळी खेळली. दोन्ही फलंदाजांनी वेगवान धावा करताना अनेक विक्रम केले. विशेषत: विराट कोहलीने गेल्या चार एकदिवसीय सामन्यांमध्ये तिसऱ्यांदा शतक झळकावले. यापूर्वी त्याने बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्धच्या याच मालिकेतील पहिल्या सामन्यात शतके झळकावली होती. या सामन्यात गिलने 116 आणि कोहलीने 166 धावा केल्या.

विराट कोहलीचे हे वनडे क्रिकेटमधील 46 वे शतक होते. वनडेत सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या सचिनपेक्षा तो केवळ तीन शतकांनी मागे आहे. सचिनने वनडेमध्ये 49 शतके ठोकली आहेत, तर कोहलीने 46 शतके झळकावली आहेत. त्याचवेळी, या सामन्यात त्याने श्रीलंकेविरुद्ध वनडेत 10व्यांदा शतक झळकावले. एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत तो अव्वल स्थानी पोहोचला आहे. या प्रकरणात त्याने सचिन तेंडुलकरला मागे सोडले. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेमध्ये नऊ शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध 10 वनडे शतके झळकावली आहेत. कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध नऊ एकदिवसीय शतके झळकावली आहेत.

Virat Kohli was utterly glorious 🙌 🙌 as he creamed 1⃣6⃣6⃣* and was our top performer from the first innings of the third #INDvSL ODI 👏 👏

A summary of his stunning batting display 🔽 #TeamIndia pic.twitter.com/SWrC5Oanhg

— BCCI (@BCCI) January 15, 2023

वनडेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीतही विराटने श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेला मागे टाकले आहे. 448 सामने खेळलेल्या महेला जयवर्धनेने 418 एकदिवसीय सामन्यांमध्ये 33.37 च्या सरासरीने आणि 78.96 च्या स्ट्राइक रेटने 12650 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर विराट कोहलीने 268 सामन्यांच्या 259 डावांमध्ये 12700 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ५८ आहे आणि स्ट्राइक रेट ९३ च्या जवळ आहे. वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली आता पाचव्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, रिकी पाँटिंग आणि सनथ जयसूर्या आता त्यांच्या पुढे आहेत.

Take a bow, Virat Kohli 🫡

Live – https://t.co/muZgJH3f0i #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/7hEpC4xh7W

— BCCI (@BCCI) January 15, 2023

विराट कोहलीने 15 जानेवारीला चौथ्यांदा शतक झळकावले. यापूर्वी, 15 जानेवारी 2017 रोजी त्याने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 122 धावांची खेळी केली होती. त्याच वेळी, 15 जानेवारी 2018 रोजी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात 153 धावा केल्या होत्या. 15 जानेवारी 2019 रोजी, कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 104 धावा केल्या. आता त्याने 15 जानेवारी 2023 रोजी श्रीलंकेविरुद्ध 166 धावांची इनिंग खेळली होती.

📹 Mighty Maximum – a 97m SIX from Virat Kohli 👀👀

Live – https://t.co/q4nA9Ff9Q2 #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/R3CzXTWBT5

— BCCI (@BCCI) January 15, 2023

Cricket Again Virat Kohli Centaury Against Sri Lanka


Previous Post

श्रीसंत निवृत्तीनाथ यात्रेसाठी त्र्यंबक नगरी सज्ज; यंदाची ही आहेत वैशिष्ट्ये, असे आहे नियोजन

Next Post

शुभमन गिलनेही श्रीलंकेच्या गोलंदाजांना धुतले; झळकावले दुसरे शतक (Video)

Next Post

शुभमन गिलनेही श्रीलंकेच्या गोलंदाजांना धुतले; झळकावले दुसरे शतक (Video)

ताज्या बातम्या

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023

ट्रॅक्टरने वाळू वाहतूक करण्यासाठी लाच; पोलिस अंमलदार व होमागार्ड एसीबीच्या जाळ्यात

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group