नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीला ब्लॅकमेल करत ४ लाख ५० हजार रुपयांची खंडणी उकळणा-या पत्नी व प्रियकराविरुध्द न्यायालयाच्या आदेशाने अंबड पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचून दोघांचे अश्लिल फोटो मोबाईलवर पाठवले. पतीने बदनामी होईल या भीतीने ४ लाख ५० हजार रुपये दिल्याचेही समोर आले आहे.
या धक्कादायक प्रकरणाबाबत पतीने दिलेल्या तक्रारीनुसार, एका अनोळखी नंबरहून फोन आला. या फोनवर अनोळखी व्यक्ती तुझ्या पत्नीचे लग्नानंतरही दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबध असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्या दोघांचे खासगी फोटो आणि खासगी क्षणाचे व्हिडीओ रेकॉर्डींग सुध्दा माझ्याकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर पत्नीचे नग्न अवस्थेतील फोटो मोबाईलवर पाठवले. त्यानंतर प्रकरण मिटवण्यासाठी ४ लाख ५० हजार रुपये या व्यक्तीने लुबाडले.
हा सर्व प्रकार पत्नीने प्रियकराच्या मदतीने केल्याचे कळाल्यानंतर पीडित व्यक्तीने न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने पत्नी व प्रियकराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निरीक्षक भागीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.