India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

उन्हाळ्यात धने उत्तम का असतात… आहारात त्याचा समावेश का करावा… जाणून घ्या त्याचे गुणधर्म आणि सर्व काही

India Darpan by India Darpan
May 12, 2023
in विशेष लेख
0

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
स्वयंपाक घरातील वनस्पती
धने (धान्यक)

आपण रोज स्वयंपाकात जी कोथिंबीर वापरतो तिची वाळवलेली फळे म्हणजे धने होत. याला हिंदीत धनीयां ,संस्कृतमध्ये धान्यक,इंग्रजीत कोरिएण्डर म्हणतात. धन्याचे वर्षायु म्हणजे केवळ वर्षभर राहणारे झुडुप असते. फुले पांढरट जांभळी असतात. छत्रीसारखी गुच्छाने येतात. फळ किंचित लंबगोल असते. ताजे असतांना हिरवे व वाळल्यावर पोपटी रंगाचे होते. कोथिंबीर पूर्ण भारतभर होते व रोज वापरलीपण जाते.

डॉ. नीलिमा हेमंत राजगुरु
आयुर्वेदाचार्य
मो. 9422761801.
ई मेल – [email protected]

ओली कोथिंबीरीची पाने आपण रोज स्वयंपाकात वापरतो. त्यामुळे पदार्थांना विशिष्ट सुगंध व चव येते. पदार्थ सजवायला पण कोथिंबीर वरून वापरली जाते. पोहे,सांजा, ढोकळे हे तर कोथिंबीरीशिवाय अपूर्णच वाटतात. कोथिंबीर वडी पण खूप जणांच्या आवडीची असते. तसेच हिरव्यागार कोथिंबीर चटणी शिवाय नैवेद्याचे ताट अपूर्णच असते. कोथिंबीर पित्त कमी करणारी, शरीराला थंडावा देणारी आहे, पण लक्षांत ठेवा ती प्रमाणातच वापरायला पाहिजे. नाहीतर पित्तप्रकृतीच्या लोकांना ती त्रासदायक ठरू शकते.

गुण:-
कोथिंबीर पाचक, भूक वाढवणारी, तहान ,आग , दाह कमी करणारी आहे. रोज आहारात कोथिंबीर घेतल्याने मधुमेह व कर्करोगापासून बचाव होतो.

सर्वांगावर पीत्त उठते म्हणजे लालसर गांधी उठतात ,त्यावेळी ताज्या कोथिंबीरीचा रस काढून तो त्या जागी लावावा. लगेच आराम पडतो.

आता धन्याचे गुण बघू-
धने पचायला हलके,तुरट,तिखट, कडू व गोड हे चारही रस असणारे आहेत. त्यात लोह, कॅल्शियम , मॅग्नेशियम ही खनिजे असतात.धने तसे गुणाने ऊष्ण आहेत. पण पचल्यावर ते गोड रस निर्माण करतात. थोडक्यात धने हे वात पित्त व कफ या तिन्ही दोषांवर गुणकारी आहेत.

धन्याचे बाहेरुन उपयोग :——-
१) सूजेवर धन्याचा लेप लावल्याने सुज उतरते व वेदनाही कमी होतात.कोवळ्या हिरव्या धन्यांचा लेप पित्ताने होणाऱ्या डोकेदुखीत उत्तम काम करतो.
२) बिब्याचे तेल अथवा बिब्बा उतला असतांना धन्याचा लेप विशेष कार्य करतो. पित्तामुळे येणाऱ्या कोणत्याही सूजेवर ,नागिन , गंडमाला या विकारात हिरवे धने वाटून त्याचा लेप केल्यास आग व दुखणे कमी होते.

३) तोंड आल्यावरहिरव्या धन्याचा काढा करून त्याच्या गुळण्या करतात.
४)नाकातून रक्त आल्यास म्हणजे घोळणा फुटल्यास हिरव्या धन्याचा किंवा कोथिंबीरीचा २ थेंब रस नाकात टाकावा. लक्षात ठेवा हे प्रथमोपचार म्हणूनच करावे. लगेच वैद्यकीय सल्ला घ्यावा.
५) डोळे आल्यावर पण धन्याच्या काढ्याने डोळे धुवावे.

धन्याचे पोटातून उपयोग :——-
१) धने पाचक, भूकवर्धक ,पदार्थांना तसेच जिभेला चव आणणारे ,कृमिनाशक ,यकृत उत्तेजक आहे. त्यामुळेच आपल्या रोजच्या जेवणात धने असतातच. म्हणजे आपण भारतीय जे मसाले वापरतो त्यांचा धणे हा अविभाज्य भाग असतो.
२)उन्हाळयात किंवा ताप आल्यावर खूप तहान लागते , अशा वेळी धने ५-६ तास पाण्यात भिजत टाकून ते पाणी पिण्यास वापरावे. तसेच उलट्या ,जुलाब होत असतील तरी हे पाणी वारंवार पिण्यास द्यावे. तसेच उन्हाळयात उन्हाळी लागते म्हणजे वारंवार व गरम अशी मूत्रप्रवृत्ती होते. अशा वेळी हे धन्याचे व त्याबरोबर जिरे घातलेले पाणी वारंवार प्यायला द्यावे.

३) पोटात गॅसेस होणे , पोट दुखणे यात धने , सुंठ ,सैंधव व किंचित लिंबूरस जेवणाच्या सुरूवातीला घ्यावा.
४) रक्ती मूळव्याधीतही धन्याचा काढा घ्यावा.
५) खोकला व श्वास लागणे यात धणे व खडीसाखर तांदळाच्या पाण्यातून वारंवार द्यावे.

धने ,गुळ ,खोबरे घालून केलेला प्रसाद धन्वंतरी जयंतीला म्हणजेच धनत्रयोदशी च्या दिवशी आवर्जून खाल्ला जातो. तसेच जन्माष्टमी , रामनवमी , हनुमानजयंतीला पंजीरी करतात त्यातही धने असतातच.

कोथिंबीर रेसिपी :
कोथिंबीरीची पातळ भाजी.
साहित्य : – धुवून चिरलेली कोथिंबीर १ वाटी , ताक अर्धी वाटी, चणा दाळ किंवा तांदूळ पीठ १ चमचा , १ हिरवी मिरची, मीठ व साखर चवीप्रमाणे ,कढीलिंब , जिरे, मोहरी ,तेल ,हिंग

कृती:- प्रथम कोथिंबीर शिजवून घ्यावी ,त्यात पीठ मिसळून एकजीव करावे. पातेल्यात तेल तापवून चांगली कडकडीत फोडणी करावी.कढीलिंब व मिरची पण फोडणीत टाकावी.नंतर त्यात एकजीव केलेले कोथिंबीरीचे मिश्रण टाकावे. ताक, साखर व मीठ टाकून चांगले उकळून घ्यावे. ही भाजी सूपासारखी पातळ पण करता येते. पण भाताबरोबर थोडी घट्टच छान लागते. साखर आवडत नसल्यास नाही टाकली तरी चालते.

धने रेसिपी :- धान्यक मंथ ( fortified water with coriander )
साहित्य :—- घने, जिरे जाडसर पावडर प्रत्येकी १ चमचा , संत्र्याची साल बारीक तुकडे करून १ चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर १ चमचा ,काळे मीठ चिमूटभर , खडीसाखर २ चमचे,मिरपुड चिमूटभर, २ ग्लास पाणी ,१ छोटे मातीचे भांडे

२ ग्लास थंड पाणी एका पातेल्यात घेऊन त्यात मीठ व साखर सोडून सर्व साहित्य एकत्र करा . रविने ते मिश्रण चांगले घुसळून घ्या. मातीच्या भांड्यात ५-६ तास ठेवून द्या . देतांना काचेच्या ग्लासमध्ये काढून त्यात मीठ व साखर चवीप्रमाणे घालून द्या. लहान मुले ,वृद्ध यांना हे गाळून द्यावे. नाहीतर तसेही छान लागते.

ऊन्हाळ्यासाठी हे एक उत्तम पेय आहे.

डॉ. नीलिमा हेमंत राजगुरु
आयुर्वेदाचार्य
मो. 9422761801.
ई मेल – [email protected]
Coriander Benefits Health Nutrition by Neelima Rajguru


Previous Post

आर्यन खान प्रकरणातील अधिकारी समीर वानखेडेच्या घरी सीबीआयचा छापा… गुन्हा दाखल

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पत्नीचा प्रश्न आणि पतीचे उत्तर

Next Post

इंडिया दर्पण - हास्य षटकार - पत्नीचा प्रश्न आणि पतीचे उत्तर

ताज्या बातम्या

देशभरात ४६ ठिकाणी रोजगार मेळ्यात ५१ हजार नियुक्ती पत्रांचे वितरण, महाराष्ट्रात इतक्या जणांना मिळाली संधी

September 26, 2023

ब्राझीलच्या शिष्टमंडळाची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट, या विषयावर झाली चर्चा

September 26, 2023

नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्र प्रदर्शनी, बाबनकुळे यांनी केले उदघाटन

September 26, 2023

कॅनडा – भारत तणाव…. न्यूयॉर्क टाइम्स मध्ये प्रसिद्ध झाले हे खळबळजनक वृत्त.. आता काय होणार…

September 26, 2023
प्रातिनिधिक फोटो

धक्कादायक… लग्नाचे आमिष… महिलेची फसवणूक… मुलाला ५० हजारात विकले

September 26, 2023

गिरीश महाजन यांची शिष्टाई यशस्वी… धनगर समाज आरक्षण आंदोलन मागे

September 26, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group