India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

गुंतवणूकदारांसाठी मोठी गुडन्यूज! या कंपनीत अडकलेले पैसे मिळणार परत; तातडीने हे करा

India Darpan by India Darpan
November 23, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुंतवणूकदारांसाठी अत्यंत मोठी गुडन्यूज आहे. अनेक गुंतवणूकदारांनी पर्ल्स (Pearls) नावाने ओळखल्या जाणाऱ्या पीएसीएल इंडिया लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केली होती. देशभरातील लाखो गुंतवणूकदारांचा पैसा या कंपनीत अडकलेला आहे. या कंपनीचे जाळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागापर्यंत पसरले होते. त्यामुळेच अनेक गुंतवणुकदारांनी या कंपनीत पैसा गुंतवण्याचा निर्णय घेतला होता. आता या कंपनीच्या गुंतवणुकदारांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे.

गुंतवणुकदारांच्या पैसे परत मिळत नसल्याने या कंपनीचा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला होता. त्यानंतर निवृत्त न्यायमूर्ती लोढा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पर्ल्सच्या गुंतवणूकदारांसाठी परतावा योजनाही आणली होती. त्यासाठी अनेकांकडून गुंतवणूकीचे प्रमाणपत्र जमा करुन घेण्यात आले आहे. आता या योजनेत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना रक्कम मिळण्याची आशा वाढली आहे. त्यांच्या खात्यात लवकरच गुंतवणुकीचा पैसा परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सेबीने याविषयीची माहिती दिली आहे.

पीएसीएल इंडिया लिमिटेडमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे, असा दावा सेबीने केला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी १५००० रुपयांसाठी दावा दाखल केला होता, त्यांना गुंतवणुकीची रक्कम परत करण्यात येत आहे. ही प्रक्रिया सुरु झाली आहे. गुंतवणूकदारांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.

याबरोबरच, ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचे प्रमाणपत्र ही दिले आहे. पण त्यांच्या अर्जात काही त्रुटी राहिल्या आहेत, अथवा चुका झाल्या आहेत. त्यांना ऑनलाईन यामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. ही दुरुस्ती घरबसल्या करता येईल. पीएसीएल गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा देण्याची प्रक्रिया जानेवारी २०२०पासून सुरु आहे. त्यावेळी ५००० रुपयांचा परतावा देण्यात आला. पुढील वर्षी जानेवारी २०२१मध्ये गुंतवणूकदारांना १०००० रुपयांचा परतावा देण्यात आला. तर आता यापेक्षा जास्त गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यात येणार आहे. १०००१ रुपयांपासून ते १५००० रुपयांपर्यंतच्या गुंतवणूकदारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. एप्रिल २०२२पासून ही प्रक्रिया सुरु झालेली आहे.

अर्जात त्रुटी असल्यास..
तुम्ही केलेल्या अर्जात त्रुटी असल्यास किंवा अर्ज करताना चूक झाली असल्यास sebipaclrefund.co.in या वेबसाइटवर जाऊन ती दुरुस्त करता येणार आहे. त्यासाठी ३१ जानेवारी २०२३ पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर तुम्हाला संधी मिळणार नाही. तर ज्यांच्या खात्यात रक्कम आलेली नाही. त्यांना दुरुस्तीसाठी एक ठराविक कालावधी देण्यात आला. त्यांना तोपर्यंत दुरुस्ती केल्यास त्यांचा १५००० रुपयांपर्यंतच्या दाव्याचा निपटारा करण्यात येणार आहे.

Company Money Refund Investors SEBI Good News
Pearl Chit Fund Supreme Court PACL


Previous Post

बिबट्याचा मध्यरात्री थरार; दोन तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंद (बघा व्हिडिओ)

Next Post

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद पुन्हा पेटणार; सांगलीतील जत तालुक्यासह ४० गावांवर कर्नाटकचा दावा

Next Post

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद पुन्हा पेटणार; सांगलीतील जत तालुक्यासह ४० गावांवर कर्नाटकचा दावा

ताज्या बातम्या

राशीभविष्य

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवा, जाणून घ्या, शनिवार – ३० सप्टेंबर २०२३ चे राशिभविष्य

September 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

धक्कादायक…..दिडोंरीत बलात्काराच्या गुन्हात अटक असलेला आरोपी नाशिकमध्ये पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून गेला.. बघा…नेमकं काय घडलं

September 29, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – इंग्रजीचे महत्त्व

September 29, 2023

दिंडोरी तालुक्यात शाळेच्या आवारात झालेल्या गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम वादात, शिक्षणमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

September 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

मतदार यादीचे काम करतानाच शिक्षकाचा मृत्यू… जळगाव जिल्ह्यातील घटना…

September 29, 2023

कर्मयोगीनगरमध्ये अभूतपूर्व उत्साहात गणेश विसर्जन; तीन हजार आठशे मूर्ती, दोन ट्रॅक्टर निर्माल्य संकलन

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group