पुणे – देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेली ‘मारुती सुझुकी इंडिया’ ही भारतीय बाजारपेठेसाठी 5 नवीन प्रकाराच्या SUV आणण्यासाठी सज्ज आहे. यामध्ये नवीन-जनरल मारुती ब्रेझा, 5-डोर जिमनी, बलेनो-आधारित क्रॉसओवर, मध्यम आकाराची एसयूवी आणि तीन-रो एसयूवी यांचा समावेश असेल.
ही नवीन प्रकारची कॉम्पॅक्ट एसयूवी कार ही ह्युंदाई व्हेन्यू आणि किया सोनेटच्या टॉप व्हेरियंटशी स्पर्धा करेल. मारुती सुझुकीची ही 7 सीटर एसयूवी हुंडई अल्कझार, एमजी हेक्टर प्लस आणि टाटा सफारी च्या स्पर्धेत आणली जात आहे. एका अहवालानुसार, मारुतीची 3-रो एसयूवी, कोडनेम Y17 ही कंपनीच्या इट्रेग्रा एमपीव्ही प्रमाणेच असेल. हे मॉडेल 6 सीटर आणि 7 सीटर कॉन्फिगरेशनमध्ये सादर केले जाऊ शकते. मारुती सुझुकीचे हे फ्लॅगशिप मॉडेल असेल म्हणजेच कंपनीची सर्वात महागडी कार असणार आहे. यात अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ऑटो हेडलाइट्स आणि क्रूझ कंट्रोल सारखी वैशिष्ट्ये मिळू शकतात.
या कारमध्ये 1.5 लीटर 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन हायब्रीड तंत्रज्ञानाने दिले जाऊ शकते. इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये जोडले जाऊ शकते. तसेच XL6 च्या जागी नवीन मारुती 7-सीटर एसयूवी आणली जाऊ शकते. त्याच वेळी, कंपनी पुढील महिन्यात मारुती XL6 ला मिड-लाइफचा अपडेट देणार आहे.
मारुती सुझुकी कंपनी पुढील वर्षी जानेवारीपासून वाहनांच्या किमती वाढवणार आहे. वेगवेगळ्या मॉडेल्सवर दरवाढ अवलंबून असेल, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने या वर्षी मार्च, जुलै आणि सप्टेंबरमध्ये दरवाढीची घोषणा केली होती. मारुती सुझुकीने अलीकडेच आपल्या व्हॅन इकोची किंमत 8 हजार रुपयांनी वाढवली आहे. इकोमध्ये एअरबॅग जोडल्यामुळे ही वाढ झाली आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.