इंडिया दर्पण विशेष लेखमाला
जागो ग्राहक जागो
घरगुती किंवा भटक्या कुत्र्यांचा त्रास आणि तक्रार
कुत्रे चावल्यामुळे गुडगाव कॉर्पोरेशनला ग्राहक आयोगाकडून रुपये २ लाख रुपयांचा दंड केला आहे. ही बाब सध्या देशभरात चर्चेत आहे. आपल्यालाही भटक्या कुत्र्यांचा त्रास असेल तर तुम्हाला तक्रार करण्याची संधी आहे. तुम्हाला योग्य ती मदत मिळू शकते.
गुडगाव जिल्हा ग्राहक आयोग यांनी केस क्रमांक CC/७४१/२०२२ मध्ये एक जबरदस्त निर्णय दिला आहे. एका व्यक्तीचे पाळलेले कुत्रे एका स्त्रीला रस्त्याने जात असताना चावल्यामुळे त्या स्त्रीला भरपूर जखमा झाल्या आणि त्यामुळे गुडगाव महानगर पालिका यांना रुपये २ लाख नुकसान भरपाई देणेचा आदेश दिला आहे. शिवाय गुडगाव मुनिसिपल कॉर्पोरेशनला फॉरेन ब्रीडचे घातक कुत्र्यांचे लायसेन्स रद्द करून ती सर्व कुत्री ताब्यात घेण्याचा आदेश दिला आहे.
प्रत्येक घरगुती कुत्रे पाळणाऱ्या व्यक्तीने कुत्रे बाहेर घेऊन जाताना कुत्र्याचे तोंड व्यवस्थित बांधले पाहिजे तसेच कुत्र्याची घाण गोळा केली पाहिजे या बाबत आदेश दिले आहेत. शिवाय कॉर्पोरेशनने सर्व भटकी कुत्री त्वरित पकडा असा आदेश दिला आहे. या आदेशामुळे सर्व नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सर्व ग्राहक नागरिकांनी आपल्या आपल्या कॉर्पोरेशन, ग्रामपंचायत, नगरपालिका यांना पत्रे देऊन भटकी कुत्री पकडणे साठी भाग पाडावे कारण भटक्या कुत्र्या मुळे सर्वत्रच दहशत पसरली आहे.
तसेच जे लोक पाळीव कुत्री पाळत आहेत त्यांनी पण सदर आदेश जरूर वाचवा आणि त्याचे पालन करावे कारण सदर रुपये २ लाख हे कुत्रे मालक यांचे कडून वसूल करणेची मुभा कोर्टाने कॉर्पोरेशन ला दिली आहे.
आपले शहर स्वच्छ ठेवणे साठी या आदेशात नमूद केल्या प्रमाणे जर शेजारी पाजारी कुत्रे सांभाळत असतील आणि ते कुत्र्याची घाण रस्त्यात करत असतील तर त्यांची तक्रार कॉर्पोरेशन कडे करा आणि कॉर्पोरेशनने दखल घेतली नाही तर सरळ जिल्हा ग्राहक आयोगात कॉर्पोरेशनची तक्रार करा.
आपणास काहीही मार्गदर्शन हवे असेल तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतशी अवश्य संपर्क करावा.
आमची वेबसाईट : www.abgpindia.com
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286, श्री दिपक सावंत 9833398012
*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 9975712153
*सातारा* – श्री जयदीप ठुसे 9767666346
*अहमद नगर* – अतुल कुऱ्हाडे 9860365551
*नाशिक* – रवींद्र अमृतकर 9860798999
*जळगाव* डॉ अनिल देशमुख 9422541881
*पंढरपूर*- शशीकांत हरीदास 9423536395
*सांगली* – सुर्यवंशी सर्जेराव 9763722243
*कोल्हापूर*- सुप्रिया ताई 7038887979
*नंदुरबार* – वदंना तोरवणे 9421526777.