इंडिया दर्पण विशेष लेखमाला – खेळाच्या मैदानातून
विश्वविजेतेपदाचा नवा दावेदार
बुद्धिबळ विश्वविजेतेपद सतत पाच वेळा जिंकणारा मॅग्नस कार्लसन येत्या जानेवारी २०२३ मध्ये सहाव्यांदा जिंकण्यासाठी आपला कोण प्रतिस्पर्धी असेल त्याची वाट पाहत होता. तो प्रतिस्पर्धी आता रशियाच्या आयन नेपोम्नियाची (थोडक्यात नेपो) रुपाने जाहीर झाला आहे. आणि तो एक तगडे आव्हान निर्माण करणार हे नक्की…

लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
बुद्धिबळ खेळात जागतिक विश्वविजेतेपदाची लढत इतर खेळांपेक्षा वेगळ्या पध्दतीने होते. येथे विश्वविजेता दर दोन वर्षांनी होणाऱ्या लढतीत सरळ अंतिम सामना म्हणजे विश्वविजेत्या पदाच्या लढतीतच खेळतो. त्याच्या बरोबर विश्वविजेतेपदाच्या सामन्यात कोण खेळणार म्हणजेच त्याचा challenger कोण हे ठरविण्यासाठी दोन वर्षांतील काही अत्यंत मह्त्वाच्या स्पर्धा (ग्रांप्री, ऑलिंपियाड इ) या महत्त्वाच्या ठरतात. तसेच, क्रमवारीत (ranking) top ranked काही खेळाडू मिळून आठ खेळाडू विश्वविजेत्या स्पर्धेआधी साधारण सहा महिने Candidates नावाची स्पर्धा खेळतात. त्यात प्रत्येकाने प्रत्येकाशी दोनदा खेळायचे असते.
माद्रिद येथे Candidates स्पर्धा संपन्न झाली आणि त्यात रशियाच्या आयन नेपो (म्नियाची) याने ही स्पर्धा १४ पैकी ९:५ गुण मिळवून जिंकली. विशेष म्हणजे तो एकमेव असा खेळाडू होता जो १४ पैकी एकही सामना हरला नाही (५ विजय आणि ९ बरोबरी).
खरं तर गेली दोन वर्षे मूळचा इराणचा पण सध्या फ्रान्सचा असलेला अलिरझा फिरौझा, चीनचा डिंग लिरेन आणि पोलंडचा जान डुडा हे तरुण खेळाडू बुद्धिबळच्या जगातील सर्व मह्त्वाच्या स्पर्धा गाजवित आहेत. त्यामुळे ते पाहता पाहता अव्वल १० खेळाडूत आले आणि त्यापैकीच कुणीतरी Candidates जिंकेल असे बुद्धिबळ शौकीन मानत होते. पण नेपोने सगळ्याचे अंदाज चुकवले. सहाजिकच Candidates यापैकी कुणीतरी जिंकणार असाच अंदाज जगातील बुद्धिबळ जाणकार करीत होते. आणि अचानक नेपोने सगळ्यांना चकीत करुन टाकले.
“त्याने खास वेगळी तयारी केली असणार” असे माजी विजेता गॅरी कॉस्पोराव म्हणाला.
आता एक नवीनच समस्या उभी राहिली आहे. काही दिवसांपूर्वी कार्लसनने जाहीर केले की तो सर्व जुन्या खेळाडूबरोबर खेळून (म्हणजे त्यांना अनेक वेळा हरवून) कंटाळून गेला आहे. कार्लसनने सांगूनच टाकले की, फक्त नव्या दमाचा १९ वर्षीय फिरौझा Challenger म्हणून आला. (म्हणजे फिरौझा ने Candidates स्पर्धा जिंकली) तरच तो येणारी विश्वविजेतेपदाची स्पर्धा खेळेल अन्यथा विश्व विजेतेपदावर तो पाणी सोडायला तयार आहे. कार्लसनने हे अधिकृतरित्या अजून जाहीर केले नाही. पण अशी वेळ आली तर जागतिक बुद्धिबळ संघटनेने जाहीर केले आहे की, Candidates स्पर्धेतील उपविजेता (म्हणजे चीनचा डिंग लिरेन) आणि विजेता नेपो यांच्यात विश्वविजेतेपदाची लढत होईल.
हे जागतिक संघटनेने Candidates सुरु होण्याआधीच जाहीर केल्याने उपविजेता पदासाठी लिरेन, अझरबैजानचा टिमुर राज्बादोव (७:५) अमेरिकेचे हिकारु नाकामुरा (७:५) आणि फॅबियानो करुअना (६;५) यांच्यात जबरदस्त चुरस विशेषत: शेवटच्या काही डावात पहायला मिळाली. अखेर पहिल्या नऊ डावात एकही सामना न जिंकू शकणाऱ्या लिरेनने पुढील ५ सामन्यातील ३ जिंकले आणि दोन सामन्यामध्ये बरोबरी करून दुसऱ्या स्थानावर मुसंडी मारली. आणि आता जर कार्लसन खेळला नाही तर लिरेन आणि नेपो विश्वविजेतेपदाची स्पर्धा खेळतील.
१९७५ साली अमेरिकेच्या बॉबी फिशर नेही बोरिस स्पास्की विरूध्द जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत विजेतेपद राखण्यासाठी स्पर्धा खेळायला नकार दिला होता. तेव्हा स्पास्कीला विजेतेपद बहाल करण्यात आले होते. पण आता नियम बदलण्यात आला आहे. आणि कार्लसनशी चर्चा करुन २० जुलै पर्यंत निर्णय घेण्यात येईल, असे जागतिक बुद्धिबळ संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे. लिरेन आता कार्लसनने अंतिम सामना खेळायला नकार द्यावा, अशी प्रार्थना आता नक्की करेल!!!
Column From Play Chess Player Ground Ian Nepomniachtchi by Deepak Odhekar