India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पुढील काही दिवसांसाठी असा आहे हवामानाचा अंदाज; जाणून घ्या थंडी वाढणार की कमी होणार?

India Darpan by India Darpan
January 19, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
मुंबईसह कोकण, खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, औरंगाबाद जिल्ह्यात सध्या काहीशा थंडी जाणवते आहे. मात्र, येत्या पुढील ५ दिवसात म्हणजे सोमवार दि.२३ पर्यन्त हवामानात बदल होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्या-त्या ठिकाणच्या पहाटेच्या सरासरी किमान तापमानात हळूहळू साधारणपणे २ ते ३ डिग्रीने वाढ होईल. म्हणजेच थंडी काहीशी कमी होण्याची शक्यता जाणवते.

निरभ्र आकाश व स्वच्छ सूर्यप्रकाशातून दुपारच्या कमाल तापमानातही सरासरीपेक्षा २ डिग्रीने झालेल्या वाढी होईल असे दिसते. त्यामुळे महाराष्ट्रात अगोदरच ऊबदारपणा जाणवतच होता, तो तसाच अजून पुढील ५ दिवस टिकून राहील, असे जाणवते. पावसाळी ढगाप्रमाणे एकामागोमाग पळणाऱ्या पण वेगवेगळ्या उंचीवरून आणि २ ते ३ दिवसाच्या अंतराने सध्या उत्तर भारतातून सतत जाणाऱ्या पश्चिमी झंजावाताचाही परिणाम होणार आहे.

उत्तरेत सध्या पाऊस/बर्फ, धुके, थंडी पडतच आहे. दि. १९ ते २६ जानेवारी पर्यन्त अश्या दोन झंजावाताचा परिणाम उत्तर भारतात जाणवेल. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही जाणवते. पण थंडी पडण्यास त्याचा अपेक्षित परिणाम आपल्याकडे महाराष्ट्रात जाणवत नाही. कारण  सध्या महाराष्ट्रात जमिनीपासून हवेच्या अधिक उंच जाडीत, अस्तित्वात असलेल्या उच्च दाबामुळे, घड्याळ काट्याच्या दिशेने वाहणाऱ्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्या (अँटीसायक्लोनिक विंड) मुळे. उत्तरेकडून आपल्याकडे झेपावणाऱ्या थंडीला तयार होणारा रोध, महाराष्ट्रात कडाक्याची थंडी अजूनही जाणवू देत नाही. अर्थात कडाक्याची आवर्तने ह्यापुढेही येऊ शकतात.
सध्या विशेष इतकेच!

Cold Winter Forecast Weather Climate


Previous Post

हिमाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात नाशिकच्या माया सोनवणे, रसिका शिंदे चमकल्या

Next Post

LIVE पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत जाहीर सभा सुरू (बघा थेट प्रक्षेपण)

Next Post

LIVE पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत जाहीर सभा सुरू (बघा थेट प्रक्षेपण)

ताज्या बातम्या

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023

…तर व्हॉट्सअॅपच्या वापरावर येणार मर्यादा; सर्वोच्च न्यायालयाने दिले हे आदेश

February 3, 2023

ठाकरे गटाच्या नेत्यांना थेट आयफोन वापरण्याचा सल्ला; पण का? त्याने काय होणार?

February 3, 2023

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिला अर्थसंकल्प; थेट जनतेतून मागितल्या संकल्पना आणि सूचना, तत्काळ येथे पाठवा

February 3, 2023

नाचणी कुकीज, लाडू, बाजरी चिवडा, नाचणी सत्व या पदार्थांना मोठी मागणी; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group