मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून माणसांमध्ये आल्यासारखे वाटतं आहे. मी माईक समोर मास्क काढला आहे. तसा मास्क मी १४ तारखेला काढणार आहे. येत्या १४ तारखेपासून माझ्या सभांचा धडाका सुरू होईल, अशी घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली.
मुंबई महापालिकेच्या सर्वांसाठी पाणी या योजनेचा शुभारंभ ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आयोजित समारंभामध्ये ते बोलत होते. ठाकरे पुढे म्हणाले की, सर्वांसाठी पाणी हे नवे आणि कल्पक धोरण आणणारी मुंबई ही देशातील पहिली महापालिका आहे. येत्या १४ तारखेला मी अनेकांचा मास्क काढणार आहे. कारण, हा महापालिकेचा कार्यक्रम आहे. मी पाणी गढूळ करु पाहत नाही. पाणी देण्याच्या आणि त्यातही सर्वांना देण्याच्या कार्यक्रमात मला राजकारण आणायचं नाही, असे सांगत ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.
ठाकरे यांनी सांगितले की, विरोधी पक्ष हा केवळ विरोधासाठी नसतो. तर, चांगल्या कामाचे कौतुक करणे, चांगल्या सूचना मांडणे, नागरिक किंवा सर्वसामान्यांच्या अडी-अडचणी निदर्शनास आणून देणारे असे हवेत, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. ईलेक्ट्रिक बस चालवणारी मुंबई ही पहिली महापालिका आहे. सीबीएसई बोर्डापासून अनेकविध प्रकारचे उपक्रम राबविणारी मुंबई महापालिका आणि तिचे उपक्रम कौतुकास्पद आहेत. आता सर्वांना पाणी मिळणार आहे. ही बाब खुपच सुखावह आहे. समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पाचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकण्यासाठी बघा खालील व्हिडिओ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 7, 2022