India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

संसदेच्या नवीन इमारतीत बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेसाठी पंतप्रधानांना साकडे; मुख्यमंत्री शिंदेंची माहिती

India Darpan by India Darpan
July 25, 2022
in राष्ट्रीय
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सेंट्रल व्हिस्टा या संसदेच्या नवीन इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार असल्याची, माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. शिंदे दिल्ली भेटीवर असून आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथग्रहण समारंभात ते सहभागी झाले होते. यानंतर महाराष्ट्र सदनात माध्यमांशी बोलताना श्री शिंदे यांनी ही माहिती दिली. संसदेच्या नवीन इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी तसेच महाराष्ट्र सदनात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसविण्यात यावा, या मागणीबाबातचे राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन आपणास निवेदन दिल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

इंडिया गेट परिसरात बांधण्यात येत असलेल्या संसदेच्या नवीन इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यात यावी या संदर्भात आपण स्वत: आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून या मागणी संदर्भात निवेदन देणार असल्याचे श्री शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. या मागणीबाबत पंतप्रधान महोदय सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वासही श्री. शिंदे यांनी व्यक्त केला. कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसविण्याची मागणीही राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळाने केली असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी 
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील उमेदवारांसाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात निवास व्यवस्था करण्याची मागणी या उमेदवारांनी केलेली आहे. या उमेदवारांची दिल्लीत राहण्याची गैरसोय होऊ नये या संदर्भात कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात तत्काळ १०० ते १५० उमेदवारांच्या व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. यासह येणा-या काळात सदनातील आरक्षित भूखंडावर ५०० ते ६०० उमेदवारांची निवास व्यवस्था करण्यासंदर्भात आरखडा तयार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला केल्या असल्याचे श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

CM Shinde On Balasaheb Thackeray Image In New Parliament Building


Previous Post

बंडखोर अब्दुल सत्तार म्हणाले, ‘आताच आमदारकीचा राजीनामा देतो, पण या एका अटीवर’

Next Post

नाशिक – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Next Post

नाशिक - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

ताज्या बातम्या

सुरक्षा व दक्षता…..रेल्वे स्थानक परिसरात श्वान पथकाव्दारे तपासणी (व्हिडीओ)

August 12, 2022

मालेगाव शहरातील पाणी पुरवठा केंद्रातील सुरक्षा रक्षकाला मारहाण (व्हिडीओ)

August 12, 2022

मनमाड जवळ तरसाच्या हल्ल्यात ३ जण जखमी

August 12, 2022

झिम्बाब्वे मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार तडकाफडकी बदलला; आता याच्याकडे धुरा

August 12, 2022

आता महाविकास आघाडी फुटण्याचे संकेत; का? असं काय झालं?

August 12, 2022

पुजा चव्हाण मृत्यू प्रकरण आणि मंत्री संजय राठोड यांच्यासंदर्भात पुणे पोलिसांनी दिला हा अहवाल

August 12, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group