नाशिक: (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’ चे भूमिपूजन व उद्घाटन रविवार, १ जुन रोजी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक येथे करण्यात येणार आहे.
विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, राज्यातील शिक्षण आणि संशोधन सुधारण्यासाठी विद्यापीठात सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत चक्र (Centre for Health, Applied Knowledge & Research Autonomy) चा प्रारंभ करण्यात येत आहे. हब अॅण्ड स्पोक या धर्तीवरचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे भूमिपुजन व उद्घाटन मा. मुख्यमंत्री नामदार श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रति-कुलपती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री, हसन मुश्रीफ, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगनराव भुजबळ, जलसंपदा, विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ, कुंभमेळा व आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री गिरिष महाजन, शालेय शिक्षण विभागाचे मंत्री दादाजी भुसे, कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ, नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण खात्याचे राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे मंत्री धिरज कुमार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त राजीव निवतकर आदी मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.
विद्यापीठाचे ’चक्र’ चे भुमिपुजन व उद्घाटन समारंभाचे विद्यापीठ आवारातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीच्या धन्वंतरी सभागृहात दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाकरीता खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती यांच्या उपस्थितीत सदर सोहळा संपन्न होणार आहे.