इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चीनमधील लोकांना कोरोनापेक्षा लॉकडाऊनची जास्त भीती वाटते. शांघाय आणि इतर शहरांमधून असे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत, जे नागरिकांमध्ये पसरलेल्या भितीचा पुरावा देत आहेत. कोरोना प्रतिबंधक लस चीनने आणली असली तरी ती अतिशय भंपक असल्याचे स्पष्ट झाले आहे. लस घेऊनही नागरिक बाधित होत आहेत. त्यातच आता चीनी प्रशासनही कोरोनाला वैतागले आहे. त्यामुळेच ते नागरिकांची बळजबरीने कोरोना चाचणी करीत आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते आहे की, एक महिलेची बळजबरीने कोविड चाचणी घेतली जात आहे. ही महिला जमिनीवर पडलेली दिसत आहे. जबरदस्तीने तिची कोरोना चाचणी त्यामध्ये केली जात आहे. यानंतर महिलेचे तोंड बळजबरीने उघडले जाते आणि त्यानंतरच सूट घातलेला आरोग्य कर्मचारी स्वॅबचा नमुना घेतो. मीडिया रिपोर्टमध्ये व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही. हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप शेअर केला जात आहे. एका युजरने ट्विट करून सांगितले की हे किती भयानक आहे. गरीब आणि दुर्बल लोक कसे दबले जातात. हे दुःखदायक आहे, पूर्णपणे असह्य आहे.
ट्विटर वापरकर्त्यांनी असे आणखी व्हिडिओ पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये चीनी आरोग्य कर्मचारी त्यांना अनिवार्य कोविड चाचण्या करण्यास भाग पाडताना दिसतात. आरोग्य कर्मचाऱ्यांनी गेल्या महिन्यात एका वृद्धाच्या घरात जबरदस्तीने घुसून त्याची कोविड चाचणी केली होती. व्हिडिओ प्रथम चीनमधील ट्विटरच्या समतुल्य असलेल्या Weibo वर पोस्ट केला गेला आणि नंतर इतर प्लॅटफॉर्मवर देखील शेअर केला जाऊ लागला. हा व्हिडीओ कुठे काढला आहे हे कळू शकलेले नाही. परंतु हे अशा वेळी आले आहे जेव्हा शांघाय रहिवासी एका महिन्याहून अधिक काळ कडक लॉकडाऊनमधून जात आहेत.
खबरदारी म्हणून चीनची राजधानी बीजिंगने ४० हून अधिक मेट्रो स्टेशन आणि १५८ बस मार्ग बंद केले आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की बहुतेक निलंबित स्टेशन आणि मार्ग बीजिंगच्या उद्रेकाचे केंद्र असलेल्या चाओयांग जिल्ह्यात आहेत. बीजिंगच्या १६ पैकी बारा जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात तीनपैकी दुसऱ्याची चाचणी सुरू आहे. गेल्या आठवड्यात तीन सामूहिक तपासणी करण्यात आली. यासोबतच बीजिंगमधील लोकांना घरून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अगदी आवश्यक असेल तेव्हाच बाहेर जाण्याची परवानगी देण्यात येत आहे.
बघा हा व्हायरल व्हिडिओ
The woman was forced to do COVID-test in China. https://t.co/2E5Ba0nf15
— Dr. Ware Fong (@WeisheJiang) April 29, 2022