India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

चीनची ऑडिओ क्लीप व्हायरल; असा रचला आहे मोठा कट

India Darpan by India Darpan
May 23, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान आणखी एक लढाई सुरू होणार आहे का? चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांची एक ऑडिओ क्लिप लीक झाली असून, त्यानुसार चीन रशियाप्रमाणे तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. ही ऑडिओ क्लिप चिनी मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर हेंग यांनी ट्विट केली आहे. ५७ मिनिटांची ऑडिओ क्लिप LUDE Media च्या YouTube चॅनेलवर पोस्ट करण्यात आली आहे.

क्वाड समिटपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी या प्रकरणी चीनला कडक संदेश दिला आहे. चीनने तैवानवर हल्ला केल्यास अमेरिका प्रत्युत्तर देईल, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, तैवानवर हल्ला करण्याचा विचार करूनही चीन धोक्याशी खेळत आहे. याचा फटका त्याला सहन करावा लागणार आहे. ते म्हणाले, आम्ही वन चायना धोरणावर सहमती दर्शवली होती. मात्र कुठेही जबरदस्तीने कब्जा करण्याचा प्रयत्न झाला, तर त्यालाही चोख उत्तर दिले जाईल.

यूट्यूब चॅनलचा दावा आहे की ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही ऑडिओ क्लिप लीक केली आहे तो शी जिनपिंग यांची तैवानवरील योजना जगासमोर उघड करू इच्छित आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये, तैवानमध्ये युद्धाचे वातावरण निर्माण करण्यासाठी CPC आणि PLK यांच्यात चर्चा करण्यात आली होती. या ऑडिओ क्लिपची अद्याप पूर्ण पुष्टी झालेली नाही. मात्र, चीनमध्येच त्याचे रेकॉर्डिंग झाल्याचे संभाषणावरून दिसते.

चीनच्या इतिहासात एवढ्या महत्त्वाच्या बैठकीची ऑडिओ क्लिप लीक होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. यासाठी एक लेफ्टनंट जनरल आणि तीन मेजर जनरलना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. या क्लिपनुसार या बैठकीत चिनी लष्कराचे उच्च अधिकारी उपस्थित होते.

या ऑडिओनुसार, पूर्व आणि दक्षिणी वॉरझोन्सने ग्वांगडोंग प्रांताला दिलेल्या टास्कमध्ये 20 श्रेणींचा समावेश आहे. त्यानुसार 1.40 लाख सैनिक, 953 जहाजे, 1653 तुकड्या, 20 विमानतळ आणि गोदी, 6 दुरुस्ती आणि जहाज बांधणी यार्ड, 14 आपत्कालीन हस्तांतरण केंद्र, रुग्णालये, रक्त केंद्रे, तेल डेपो, गॅस स्टेशन इत्यादींचा उल्लेख करण्यात आला आहे. ऑडिओ क्लिप बरोबर असेल, तर चीन तैवानवर किती मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे, याचा अंदाज येऊ शकतो.


Previous Post

चिंताजनक! कोरोनामुळे दर ३३ तासांनी १० लाख नागरिक होताय अत्यंत गरीब; महागाईचा भडका वाढला

Next Post

लागा कामाला ! महापालिका निवडणूक आरक्षण सोडत या तारखेला

Next Post

लागा कामाला ! महापालिका निवडणूक आरक्षण सोडत या तारखेला

ताज्या बातम्या

‘अशी सत्ता पसंत नाही’; महाराष्ट्रातील राजकीय नाट्यात अटल बिहारींचे भाषण व्हायरल

June 25, 2022

निलम गोऱ्हे यांना उपसभापतीपदी ३ वर्षे पूर्ण; त्यांच्या कारकिर्दीचा हा आढावा…

June 25, 2022

क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्याच्या नियमात येत्या १ जुलैपासून बदल; जाणून घ्या सविस्तर

June 25, 2022

आता भारतातच होणार वाहनांचे क्रॅश टेस्टिंग; सेफ्टी रेटिंगही मिळणार

June 25, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले हे आदेश

June 25, 2022
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

मंगलाष्टकावेळी वधू-वरामध्ये कडाक्याचे भांडण; नंतर पुढं हे सगळं घडलं

June 25, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group