शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चाइल्ड पोर्नोग्राफी: जळगाव व धुळे जिल्ह्यातील तरुणांना थेट CBIची नोटिस

जाणून घ्या...कुणा-कुणा विरुद्ध झालाय गुन्हा दाखल आणि काय म्हटल आहे एफआयआरमध्ये?

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2021 | 9:07 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


जळगाव – चाईल्ड पोर्नोग्राफी (बाल अश्लिलता) प्रकरणाचे धागेदोरे थेट उत्तर महाराष्ट्रापर्यंत आले आहेत. या प्रकरणी  केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने देशभरात विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यात धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील तरुणांचा समावेश आहे. चोपडा तालुक्यातील धानोरा येथील एका तरुणाला तर शिरपूर जवळील ग्रामीण भागात राहणाऱ्या एक व्यक्ती अडकल्याचे कळते आहे. या सर्व प्रकारामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

ऑनलाइन बाल लैंगिक शोषण सामग्रीशी संबंधित गुन्ह्यांवर देशव्यापी समन्वित कारवाईमध्ये केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने १४.११.२०२१ रोजी ८३ आरोपीविरुद्ध ऑनलाइन बाल लैंगिक शोषण आणि शोषणाशी संबंधित आरोपांवर २३ स्वतंत्र प्रकरणे नोंदवली. यानंतर काल म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी देशभरात छापे टाकण्यात आले. यात जळगावातही छापे टाकण्यात आल्याची माहिती सीबीआयने आपल्या अधिकृत प्रेस नोटमध्ये दिली होती. परंतु सीबीआयच्या अधिकृत वेबसाईटवरील एफआयआर सेक्शनमध्ये गुन्ह्याची एफआयार टाकण्यात आली आहे.

त्यानुसार धानोरा येथील दीपक नारायण पाटील मोबाईल क्रमांक (9834981952) तसेच राहुल भटा पावरा पोस्ट जोड्या, सांगवी, तालुका शिरपूर, जि. धुळे मोबाईल क्रमांक (9325784232) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात 120 ब आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या गुन्ह्यात या दोघांचा नेमका भाग सहभाग आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

तर पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक पाटीलचा मुलाला नोटीस बजाण्यात आल्याचे कळतेय. तो मुलगा अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला असल्याचेही कळते. नोटीसनुसार तो नागपूरला चौकशीसाठी हजर होणार असून त्याने थोडी मुदत मागून घेतली,असल्याचेही कळतेय. यातील दीपक पाटील हे डिजिटल निरक्षर असल्याचेही कळते. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल मोबाईलच्या संदर्भात चौकशी करण्यात येत असल्याचे कारण सांगून काही लोकांनी धानोर यातून एकाची चौकशी करत नोटीस बजावली. नोटीस बजावणार लोकांनी नागपूर येथील गुप्तचर यंत्रणांकडून आले असल्याची बतावणी केली होती. एफआयआर नुसार तब्बल 31 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या ठिकाणांवर छापेमारी
सीबीआयने १४ नोव्हेंबरला चाइल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी ८३ आरोपींविरोधात २३ वेगवेगळे गुन्हे दाखल केले. याच प्रकरणी मंगळवारी सीबीआयने १४ राज्यांमधील ७७ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. यामध्ये दिल्लीमधील १९, उत्तर प्रदेशातील ११, आंध्र प्रदेशातील २, गुजरातमधील ३, पंजाबमधील ४, बिहारमधील २, हरियाणामधील ४, ओडिशामधील ३, तामिळनाडूमधील ५, राजस्थानमधील ४, महाराष्ट्रातील ३, छत्तीसगड, मध्ये प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातील प्रत्येक एक जागेचा समावेश आहे.

राज्य आणि जिल्हे
उत्तर प्रदेश – जालौन, मऊ, चंदौली, वाराणसी, गाझीपूर, सिद्धार्थनगर, मुरादाबाद, नोएडा, झांसी, गाझियाबाद, मुजफ्फरनगरमध्ये छापे
गुजरात – जुनागढ, भावनगर, जामनगरमध्ये छापे
पंजाब – संगरूर, मलेरकोटला, होशियारपूर, पतियाळा
बिहार – पाटणा, सिवान
हरयाणा – यमुनानगर, पानिपत, सिरसा, हिसार
ओडिशा – भद्रक, जाजपूर, ढेंनकनाल
राजस्थान – अजमेर, झुंझुू, जयपूर, नागौर
मध्य प्रदेश – ग्वाल्हेर
महाराष्ट्र – जळगाव, धुळे, पालघर जिल्ह्यातील सलवड
हिमाचल प्रदेश – सोलन
आणि
आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि छत्तीसगडमध्येही सीबीआयने छापे टाकले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यभरातील ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांचा बिगुल वाजला

Next Post

WhatsAppचे नवीन अॅप: लॉगिनशिवाय डेस्कटॉपवर वापरता येणार

Next Post
whatsapp e1657380879854

WhatsAppचे नवीन अॅप: लॉगिनशिवाय डेस्कटॉपवर वापरता येणार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

INDIA GOVERMENT

ऑपरेशन सिंदूर….खासदारांच्या या ७ टीम जगाला माहिती देणार..

मे 17, 2025
cbi

सीबीआयने १५ हजार रुपयांची लाच घेणा-या या बँकेच्या अधिकाऱ्याला केली अटक

मे 17, 2025
nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

मे 17, 2025
Maharashtra Police e1705145635707

राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना प्रमोशन…नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनाही पदोन्नती

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011