India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे तरी काय? युवकांना कसा घेता येईल लाभ…

India Darpan by India Darpan
May 18, 2023
in व्यासपीठ
0

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण-तरुणींना नवीन उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.

योजनेचे निकष :
या योजनेंतर्गत लाभ मिळण्याकरीता 18 ते 45 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती अर्ज करु शकते. (अजा/अज/महिला/माजी सैनिक यांना 50 वर्ष). जर प्रकल्प हा 10 ते 25 लाखासाठी असेल तर इयत्ता सातवी पास आणि जर प्रकल्प 25 ते 50 लाखासाठी असेल तर इयत्ता दहावी पास असणे आवश्यक आहे. उत्पादन उद्योगासाठी कमाल प्रकल्प मर्यादा 50 लाख रुपये आणि सेवा उद्योगासाठी कमाल प्रकल्प मर्यादा 20 लाख रुपये आहे.

प्रकल्प अहवालातील निकष :
स्थिर भांडवलाकरीता मशीनरी रक्कम कमीत कमी 50 टक्के, इमारत बांधकामाकरिता जास्तीत जास्त 20 टक्के आणि खेळते भांडवलाकरिता जास्तीत जास्त 30 टक्के असणे आवश्यक आहे. स्वगुंतवणूक 5 ते 10 टक्के, अनुदान मर्यादा 15 ते 35 टक्के आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना नवीन स्थापन होणाऱ्या उद्योगासाठी आहे. यामध्ये वैयक्तिक मालकी असलेले घटक देखील पात्र आहेत.

ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे कागदपत्रे :
पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा डोमिसीयल सर्टिफिकेट, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (आपले शिक्षण किती झाले याचा पुरावा जसे दहावी, बारावी, पदवीचे गुणपत्रक), हमीपत्र (Undertaking Form) वेबसाईटवर मेनूमध्ये मिळेल, प्रकल्प अहवाल, जातीचे प्रमाणपत्र (अजा/अज असेल तर), विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र (माजी सैनिक, अपंग), REDP/EDP/SDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असेल तर प्रमाणपत्र, लोकसंख्येचा दाखला (20000 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर), पार्टनरशिप उद्योग असेल तर रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आणि अधिकारपत्र आदी कागदपत्रे लागतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी http://maha-cmegp.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी.

Chief Minister Employment Generation Program CMEGP


Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Next Post

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

ताज्या बातम्या

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; जाणून घ्या, सोमवार, २९ मे २०२३चे राशिभविष्य

May 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – २९ मे २०२३

May 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पत्नीचे बर्थडे गिफ्ट

May 28, 2023

३५६ कोटी खर्च… मोदींच्या हस्ते उदघाटन…. महाकाल कॉरिडॉरच्या कामांचे पितळ उघड…. वादळाने मूर्ती कोसळल्या

May 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

कांदा प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदानासाठी मुदतवाढ?

May 28, 2023

उत्तर महाराष्ट्रातील तरुणांना रोजगारासाठी ‘ट्रान्सपोर्टचा एक्स्पो’ ठरला रेड कार्पेट; १२१ युवकांना आॅफर लेटर.. घसघशीत पगाराची नोकरी

May 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group