India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील जन्मगावाची धक्कादायक बाब उघड

India Darpan by India Darpan
July 24, 2022
in राज्य
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होऊन सुमारे तीन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. या जोडगोळीने अनेक निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. तसेच मागील म्हणजे उद्धव सरकारच्या निर्णयांना स्थगिती देण्याचाही कार्यक्रम सुरू आहे. त्यातच सध्या राज्यभरात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले असून अनेक ठिकाणी रस्ते पूल वाहून गेले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मूळ गावी विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी पूर पाण्यातून जावे लागते, दुसरीकडे त्याच गावात दोन दोन हेलिपॅड असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मात्र हेळसांड होत आहे. याबद्दल उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढत तात्काळ रस्ते व पूलांसह अन्य सुधारणा करण्याची करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात पावसाने गेल्या २० दिवसांपासून संपुर्ण राज्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. राज्यातल्या अनेक नदयामधील पूराच्या पाण्याचा सध्या अनेकांना सामना करावा लागत आहे. सातारा जिल्ह्यातील विद्यार्थींना पूराच्या पाण्यातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे. त्यांच्या धाडसाचे उच्च न्यायालयाने कौतुक केले आहे. तर सरकारच्या कामगिरीवरती ताशेरे ओढले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळ गावात दोन हेलिपॅड आहेत. मात्र दुसरीकडे याच गावातल्या मुलींना शाळेत जायला नीट रस्ते नसल्याची शोकांतिका आहे, अशा शब्दात न्यायमुर्ती प्रसन्न वराळे यांनी सरकारला खडेबोल सुनावले. विशेष म्हणजे यापुढे मुलींना कसल्याही प्रकारचा होऊ नये आणि चांगले शिक्षण घेता यावे यासाठी कायमस्वरुपी उपाय करावे, असे देखील हायकोर्टाने राजसरकारला सुनावले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांचे मूळ गाव दरे तर्फ तांब हे महाबळेश्वर नाजिक जावळी तालुक्यात कोयनाकाठच्या परिसरातील एक छोटेसे गाव आहे. या गावात त्यांची वडिलोपार्जित शेती, घर, चुलतभाऊ, अन्य नातेवाईक, भाऊबंद या गावात आजही राहतात. गावातील अनेक ग्रामस्थ उद्योग धंदानिमित्त मुंबईमध्ये स्थलांतरित झाले.

दरे गावात फक्त ३० घरे असून महाबळेश्वपासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. अभयारण्य आणि कोयना नदी यांच्यामध्ये हे गाव वसले आहे. या गावातील बहुतेक नागरिक हे प्रवासी मजूर असल्याने अनेक घरे ही हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात बंद असतात. परंतु पावसाळ्यात भात शेतीसाठी नागरिक गावातच राहतात आणि मुले पावसातून वाट काढीत शाळेत जातात. गावात नियमित रोजगाराच्या संधी नसल्याने अनेकांना मुंबई किंवा पुण्यात जावून काम करावे लागते.

एकनाथ शिंदे यांचे वडील बऱ्याच वर्षांपूर्वी ठाण्यात स्थायिक झाले. शिंदे यांनी गेल्या काही वर्षांमध्ये दरे गावावर लक्ष केंद्रीत करण्यास सुरूवात केली आहे. शिंदेंच्या या गावात शाळा, हॉस्पिटल या आवश्यक सोयी नाहीत. मात्र विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रस्त्याने ५० किलोमीटर किंवा नावेने १० किलोमीटर प्रवास करावा लागतो. असे असले तरी शिंदे यांनी या गावात दोन हेलिपॅड बनवले आहेत. कारण, शिंदे हे नेहमी हेलिकॉप्टरनेच आपल्या गावी येतात. यामधील एक हेलिपॅड शिंदे यांनी यापूर्वीच बनवले असून ते कोयना नदीच्या किनारी आहे, तर दुसरे त्यांच्या गावातील घरापासून काही मीटर दूर असलेल्या डोंगरावर बनवण्यात आले आहे.

जावळी तालुक्यातील खिरवंडी या गावातील मुलींना शाळेत जाण्यात जाण्यासाठी रोज जंगल आणि धरण पार करावं लागते. विशेष सध्या शिक्षण घेत असलेल्या मुली स्वत: तिथं असलेली होडी चालवून शाळेत जातात. त्यानंतर साडेचार किलोमीटर जंगल पायी चालत जावे लागते. त्यानंतर मुलींची शाळा येते. या घटनेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून त्यावर आज सुनावणी झाली. मुख्यमंत्र्यांच्या गावात दोन हेलिपॅड आहेत याला आमचा विरोध नाही. परंतु शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी काय ती लवकर उपाय योजना करावी असे न्यायालयाने स्पष्ट केले.

विशेष म्हणजे मीडियाने दखल घेतल्यानंतर हे प्रकरण संपुर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाले. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. याबाबत राज्य सरकारने सकारात्मक पाऊले उचलावी. तोडगा काढण्यासाठी मुख्य सचिवांनी राज्यातील सर्व विभागातील सचिवांची बैठक घेण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. तसेच या बैठकीत जो निर्णय होईल तो अधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्रासह सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Chief Minister Eknath Shinde Birth Place Village Current Situation


Previous Post

यंदा खरंच मंदी आहे का? बलाढ्य गुगलचे काय म्हणणे आहे?

Next Post

पोस्ट मास्तरचाच ग्राहकांच्या पैशावर डल्ला; २ कोटी अपहार प्रकरणी थेट CBIची कारवाई

Next Post

पोस्ट मास्तरचाच ग्राहकांच्या पैशावर डल्ला; २ कोटी अपहार प्रकरणी थेट CBIची कारवाई

ताज्या बातम्या

महिलेच्या घरावर दगडफेक करुन वाहनाची तोडफोड करणा-या तीन जणांना पोलिसांनी केले गजाआड

February 2, 2023

बंदी घालण्यात आलेल्या विदेशी मांगूर माश्याचे घरातील हौदात उत्पादन; ३०० किलो मासे जप्त

February 2, 2023

पेट्रोल पंपावरील कामगाराने रोकड घेवून केला पोबारा; गुन्हा दाखल

February 2, 2023
प्रातिनिधिक फोटो

गोल्फ क्लब मैदानावर मॉर्निंग वॉक करीत असतांना पाठलाग करून महिलेचा विनयभंग

February 2, 2023
प्रातिनिधीक फोटो

शेकोटीवर शेकत असतांना भाजल्याने २९ वर्षीय तरूणाचा मृत्यू

February 2, 2023

नागपूर विधान परिषद निवडणुकीत या उमेदवाराचा विजय जवळपास निश्चित; पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group