India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

शरद पवारांना ‘जाणता राजा’ का म्हणतात? छगन भुजबळ म्हणाले….

India Darpan by India Darpan
January 5, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या उपाधी आणि विशेषणं देण्यावरून महाराष्ट्रात चांगलच राजकारण सुरू आहे. अलीकडेच अजितदादांनी संभाजीराजेंना धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक म्हटले पाहिजे, असे विधान सभागृहात केले होते. त्यावर शरद पवारांनी ठाण्यातील एका दिवंगत नेत्याला धर्मवीर म्हटले जाते, याचा खोचकपणे उल्लेख केला होता. आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांना जाणता राजा म्हणायला काय हरकत आहे, असा सवाल करून नवी चर्चा छेडली आहे.

शरद पवार यांनी संभाजीराजेंच्या संदर्भात म्हटले होते की, ‘त्यांना धर्मवीर म्हणा किंवा स्वराज्यरक्षक म्हणा, काहीही फरक पडत नाही. कारण राजेंचं कार्यकर्तृत्व मोठं आहे. उपाधीवरून राजकारण करण्याची गरज नाही.’ पण अजितदादांच्या विधानावरून मात्र सत्ताधारी चांगलेच पेटले आहेत. अनेक ठिकाणी अजितदादांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. काहींनी सडेतोड प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी राष्ट्रवादीचे अनेक नेते अजितदादांच्या बाजुने भूमिका मांडताना दिसले.

छगन भूजबळ यांची गाडी मात्र नेहमी वेगळी धावत असते. त्यांच्या विधानात काहीतरी असं असतं ज्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाला चर्चा करायला खाद्य मिळतं. आता त्यांनी नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांना जाणता राजा म्हणायला काय हरकत आहे, असा थेट सवाल केला आहे.

राज्यकर्ता म्हणजे जाणता राजा
जो राज्यकर्ता असतो त्याला पूर्वी जाणता राजा म्हणत असे. शरद पवार यांनी सत्तेत असताना दिन-दलितांचे, उपेक्षितांचे कल्याण केले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. उद्योग आणले, शिक्षणाचे नवे मार्ग खुले केले. महिलांसाठी नवनव्या योजना आणल्या. त्यामुळे त्यांना जाणता राजा म्हणायला काहीच हरकत नाही. कारण जो जनतेचे भले जाणतो तो जाणता राजा असतो, असे छगन भुजबळ म्हणाले.

राज्यपालांनी काय केलं?
काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सातत्याने महापुरुषांचा अपमान करीत आहेत. भाजपच्या नेत्यांनीही तीच मालिका कायम ठेवली आहे. अश्यात अजितदादांनी काय चुकीचं केलं. त्यांनी संभाजीमहाराजांना स्वराज्यरक्षक म्हटलं आहे. पण तुम्हाला धर्मवीर म्हणायचे असेल तर नक्कीच म्हणा. तेही चुकीचं नाही, असेही छगन भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal on NCP Chief Sharad Pawar Janta Raja
Politics


Previous Post

लक्ष्मण जगताप आमदार कसे झाले? अजित पवारांनी सांगितला तो किस्सा…

Next Post

आनंदीबाई जोशी ते कांदबिनी गांगुली : अशी आहे भारतीय महिला शास्त्रज्ञांची अभिमानास्पद वाटचाल

Next Post

आनंदीबाई जोशी ते कांदबिनी गांगुली : अशी आहे भारतीय महिला शास्त्रज्ञांची अभिमानास्पद वाटचाल

ताज्या बातम्या

Good News! डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आता या सरकारी योजनेचा लाभ

February 1, 2023

फलटण-पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार देणार ९२१ कोटी रुपये

February 1, 2023
संग्रहित छायाचित्र

आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाबाबत झाले हे महत्त्वाचे निर्णय; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

February 1, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

बाल संगोपन परिपोषण अनुदानात भरीव वाढ; राज्यातील ५४ हजार लाभार्थ्यांना मिळणार एवढे पैसे

February 1, 2023

कोकणातील आंगणेवाडी यात्रेला जाणाऱ्यांना मोठा दिलासा; यंदा मिळणार या सर्व सुविधा

February 1, 2023

गाईसाठी ७० हजार रुपये… म्हशीसाठी ८० हजार रुपये… राज्य सरकारने केली खरेदी किंमतीत वाढ 

February 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group