अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला – शिवसेनेच्या शाखा सुरु करण्यात नाशिक जिल्हया बरोबरच राज्यात मी पण होतो त्यामुळे राजकीय मतभेद असले तरी शिवसेना संपायला हवी असे मला कधीही मना पासून वाटत नसल्याची प्रतिक्रीया माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्यानंतर भुजबळ आज प्रथमच आपल्या येवला मतदार संघात आले होते. यावेळी राधाकृष्ण लॉन्स येथे येवला-लासलगाव मतदार संघातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. सरकार बरखास्ती नंतर भुजबळ प्रथमच आल्याने माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मनमोकळले उत्तर दिली. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच आपण संघटने बरोबर होतो. अनेक शाखांचे उद्घाटन आपण केल्याच सांगत बाळासाहेबांची शिवसेना कधी संपणार नाही. माझ्या सारख्याला शिवसेना संपायला पाहिजे असे कधी वाटणार नसल्याच सांगत. नुकतेच नवीन सरकार आले त्यांना नांदा सौख्य भरे एेवढ्याच शुभेच्छा देऊ शकतो. झालेल्या बंडाला हे काही एका दिवसात घडलेले नाही असे मला वाटत नसल्याच भुजबळांनी यावेळी स्पष्ट केले.