मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभाग तर मंत्री अतुल लिलावती मोरेश्वर सावे यांच्याकडे दिव्यांग कल्याण विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्ध केली आहे.
भुजबळ यांची मंत्रीपदाची शपथ झाल्यानंतर त्यांच्याकडे कोणते खाते जाईल याबाबात चर्चा होती. मात्र धनजंय मुंडे यांच्याकडे असलेले खातेच त्यांच्याकडे देण्यात आले. यापूर्वी हे खाते छगन भुजबळ यांच्याकडे होते. मात्र त्यांना मंत्रीपद न दिल्यामुळे ते खाते मुंडे यांच्याकडे देण्यात आले होते.
सावे यांना अतिरिक्त खाते देण्यात आले आहे. त्यांच्याकडे दिव्यांग कल्याण विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे.

