सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चांदवड – प्रा. राहुल येवला यांची आयएनओच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

by India Darpan
नोव्हेंबर 17, 2021 | 4:21 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20211117 WA0121 2 e1637146243584

चांदवड – येथील योग विद्या धामचे योग प्रशिक्षक व केंद्रप्रमुख तसेच योगदर्शन फाऊंडेशनचे अध्यक्ष व अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व राष्ट्रीय सचिव प्रा. राहुल (अंबादास) भिला येवला यांची इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन (INO) च्या नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रा. राहुल येवला यांनी कोरोना काळात १५ जून ते ३१ ऑगस्ट २०२१ या कालावधीत नाशिक जिल्ह्यात प्रथमच चांदवड तालुक्यातील कोरोनामुक्त रुग्ण व नागरिकांसाठी इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन व पारस मिरेकल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व स्वामी शिवानंद महाराज व डॉ. तस्मिना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत योग व जलनेती प्रशिक्षण अभियान राबवले होते, त्यात त्यांनी विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थेतील कर्मचारी व ग्रामस्थ अशा दोन हजाराहून अधिक नागरिकांना मोफत योग व जलनेतीचे प्रशिक्षण दिले व सोबत जलनेती पात्र देखील मोफत वाटले. या अभियानात चांदवड तालुक्यातील अनेक कोरोनामुक्त रुग्ण व नागरिकांना खूप फायदा झाला आहे.

प्रा. राहुल येवला यांनी हे अभियान खूप मेहनत करून यशस्वीरीत्या पूर्ण केले. तसेच त्यांचे पंचवीस वर्षांतील योगदान या उत्कृष्ट व सामाजिक आरोग्य सेवा कार्याची दखल घेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे शिक्षक पदवीधर मतदार संघाचे आमदार सुधीर तांबे, चांदवड- देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी प्रशस्ती पत्र देऊन सन्मान केला. तसेच चांदवड तालुक्यातील अनेक राजकीय, शासकीय व सामाजिक संस्था व व पदाधिकारी यांच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे. त्यांचे हे उल्लेखनीय सेवा कार्य बघून आय.एन.ओ. महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष परमपूज्य श्री.१००८ महामंडलेश्वर स्वामी शिवानंद महाराज यांनी त्यांना नुकतेच नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीचे पत्र दिले आहे. या नियुक्तीमुळे नाशिक जिल्ह्यासह चांदवड तालुक्यातील नागरिकांना आयुष मंत्रालय, भारत सरकार व राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान यांच्या सहकार्याने इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने प्राकृतिक चिकित्सा व निसर्गोपचाराचा प्रचार-प्रसार होणार असून आरोग्याच्या दृष्टिकोनातून विविध समाजोपयोगी उपक्रम व सेवाकार्याचा लाभ मिळणार आहे.

प्रा. राहुल येवला यांच्या नियुक्तीबद्दल इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनंत बिरादर, समन्वयक डॉ. सुशांत पिसे, महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. कुमुद जोशी, उत्तर महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत जाधव, जॉईंट सेक्रेटरी डॉ. तस्मिना शेख, डॉ. योगेश सदगीर, योगाचार्य अशोक पाटील, समन्वयक प्रा. यु. के. अहिरे, प्रा. जिवराम गावले,आयएनओचे इतर पदाधिकारी तसेच योग विद्या धाम, अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ व श्री. नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेचे सर्व पदाधिकारी, तसेच योगशिक्षक, योग साधक व मित्रपरिवार आणि चांदवड तालुक्यातील ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राष्ट्राध्यक्षांनी रात्रीतून बदलला राष्ट्रध्वज; टीकेची झोड

Next Post

अरबी समुद्रात पुन्हा चक्रीवादळ? राज्यात पुढचे ४ दिवस पावसाचे

Next Post
प्रातिनिधिक फोटो

अरबी समुद्रात पुन्हा चक्रीवादळ? राज्यात पुढचे ४ दिवस पावसाचे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

मे 18, 2025
INDIA GOVERMENT

बांगलादेशमधून भारतात या वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

मे 18, 2025
court 1

एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सुनावली ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 18, 2025
shivaji

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

मे 18, 2025
fir111

बालकामगार नियुक्त करणे सोसायटीच्या महिला चेअरमनच्या अंगलट…गुन्हा दाखल

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011