शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारत सरकारने तुर्कीच्या या कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी केली रद्द….

by India Darpan
मे 16, 2025 | 12:49 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागरी विमान वाहतूक सुरक्षा संस्थेने (BCAS – Bureau of Civil Aviation Security) राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित कारणांमुळे मेसर्स सेलेबी (M/s Celebi) आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांची सुरक्षा विषयक मंजुरी रद्द केली आहे.

आपल्या देशाच्या आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा इतर कोणतीही गोष्ट मोठी नाही, असे या निर्णयासंदर्भात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय हित आणि सार्वजनिक सुरक्षा सर्वोच्च स्थानावर असून, त्यासोबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

त्याच वेळी, नागरी विमान वाहतूक मंत्रालय हे प्रवासी सुविधा, विमान मालवाहतूक आणि सेवांची सातत्यपूर्णता सुनिश्चित करण्यासाठी पूर्णतः वचनबद्ध आहे. त्या दृष्टीनेच या निर्णयामुळे प्रभावित विमानतळांवर प्रवाशांची तसेच वस्तूमालाची सुरळीतपणे हाताळणी होईल याची सुनिश्चिती करण्याच्या अनुषंगाने योग्य व्यवस्थाही केली गेली आहे.

यासंदर्भात केंद्रीय मंत्री स्वतः जातीने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत तसेच या निर्णयानुसारची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली जावी यासाठी मंत्रालयाच्या वतीने विमानतळ परीचालकांसोबत सक्रियपणे समन्वय राखून काम करत आहे. सेलेबीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती कायम राखली जाईल आणि त्याचे काम करत राहतील याची सुनिश्चिती करण्याच्या दिशेनेही प्रयत्न केले जात आहेत.

कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी आणि उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी विशेष पथके तैनात केली जात असल्याची माहितीही केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली. देशभरात प्रवास सुलभतेसह, विमान मालवाहतूक सुरळीत सुरू राहील याची सुनिश्चित करण्यासोबतच आम्ही राष्ट्रीय सुरक्षेचीही जपणूक करू असेही त्यांनी म्हटले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या तालुक्यात ३८ वेठबिगार व ३१ बालकामगारांची मुक्तता…प्रशासनाने धडक कारवाई करत ठेकेदारावर दाखल केला गुन्हा

Next Post

एल्डर लाईन १४५६७: ज्येष्ठांसाठी आधारवड ठरणारी मदतीची शासकीय सेवा..

Next Post
old man

एल्डर लाईन १४५६७: ज्येष्ठांसाठी आधारवड ठरणारी मदतीची शासकीय सेवा..

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011