अक्षय कोठावदे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एजुकेशन(सीबीएससी) निकालात पिंपळनेर येथील विद्यार्थिनी कु. समृद्धी कोठावदे ९५% गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ती द्वितीय आली आहे. डी.जी.अग्रवाल इंग्लिश मीडियम स्कूलची ती विद्यार्थिनी आहे. समृद्धी ही पिंपळनेर येथील व्यापारी पंढरीनाथ बेनीराम कोठावदे यांची नात आहे तर,भुसार व्यापारी किरण कोठावदे यांची कन्या आहे. समृद्धी ९५% गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल तीचे शैक्षणिक, सामाजिक,कला,सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात सर्वत्र कौतुक होत आहे. तिला डी.जी.अग्रवाल इंग्लिश मीडियम स्कूल मधील शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.
CBSE SSC Result Pimpalner Samruddhi Kothawade Second