इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एखाद्या देशाचा प्रमुख हा राष्ट्रपती किंवा पंतप्रधान असतो, तसेच शहराचा प्रमुख हा महापौर समजला जातो. त्यामुळे सहाजिकच या पदाला मोठे महत्त्व प्राप्त झालेले असते. परंतु एक मांजर एका शहराची महापौर बनली, हे ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल. मात्र हे खरे आहे! एका मांजरीला शहराचा महापौर करण्यात आला आहे. महापौर झालेले मांजर सध्या चर्चेत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊ या…
एका मांजराला अमेरिकेतील मिशिगनचे महापौर बनवण्यात आले आहे. मांजरीचे नाव जिंक्स आहे. ही तीच मांजर आहे जी आधी त्याच्या मोठ्या डोळ्यांमुळे चर्चेत होती. आता त्या महापौर झाल्यामुळे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागले आहे. दोन दिवसांपुर्वी तिची महापौरपदी निवड झाली. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एका मांजरीला महापौर करण्यात आले आहे.
जिंक्सची मालक असलेल्या मिया हिला ती तीन वर्षांपूर्वी तिच्या घराबाहेर भेटली होती. मिया म्हणाली की, जेव्हा ती जिंक्सला भेटली. ती फक्त तीन आठवड्यांची होती. मग ती त्याला घेऊन कॅलिफोर्नियाला गेली. तिथे त्याच्या लक्षात आले की, जिन्क्सचे डोळे आणि त्याचे पाय थोडे वेगळे आहेत. ते इतर मांजरींपेक्षा खूप मोठे होते. मियाने त्याला डॉक्टरांना दाखवले. हा आजार नसून जन्मत:च दोष असल्याचे डॉक्टरांनी तिला सांगितले.
मियाने जिंक्सचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो खूप व्हायरल झाला होता. काही दिवसांपूर्वी तिने एक मजेदार ट्विटर पोस्ट केली होती. त्यात म्हटले की, आजवर अनेक प्राणी महापौर होताना दिसले आहेत. आता ती आपल्या मांजरीला अध्यक्ष बनवणार आहे. मिशिगनला कोणीतरी ट्विटरवर टॅग केले आणि जिन्क्स महापौर म्हणून निवडून आली. तिला एका दिवसासाठी महापौर करण्यात आले. एका दिवसासाठी महापौर होण्यासाठी सुमारे ऐंशी युरो जमा करावे लागतात. मियाने जिंक्ससाठी खूप पैसे दिले आणि ती महापौर बनली. जिंक्सच्या टिकटॉकवर त्यांचे सुमारे ७ लाख ३५ हजार फॉलोअर्स आहेत आणि इन्स्टाग्रामवर ४ लाख फॉलोअर्स आहेत.