इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिध्द पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळल्याची दुर्घटना घडली. या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ५० जणांना वाचवण्यात यश आले आहे.
ही घटना दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारात घडल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पोलिस दाखल झाले आहे. रविवार असल्याने आज मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी होती. काही जण पुलावर उभे असतांना ही घटना घडली.
इंद्रायणी नदीवर हा जुना पूल आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर या ठिकाणी एनडीआरएफचे पथकही दाखल झाले असून बचाव कार्य अजून सुरु आहे. अंधार पडल्यामुळे बचाव कार्यात अडथळे आले. आज सकाळी आठपासून पुन्हा बचाव कार्य सुरु होणार आहे.