इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान हा गेली अनेकवर्षे मोठ्या पडद्यापासून लांब आहे. शाहरुख खान शेवटी ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता. २०१८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सध्या शाहरुख ‘पठाण’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जवळपास चार वर्षांनंतर शाहरुख खान मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. शाहरुख खानचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात आहेत. आता पुढच्या वर्षी शाहरुख खानचे तब्बल तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
गेली चार वर्षे शाहरुख होता कुठे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. शाहरुख खान शेवटी ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता. त्यानंतर शाहरुख खान चित्रपटामध्ये दिसला नाहीये. चित्रपटांपासून इतकी वर्षे दूर राहण्याचे कारण शाहरुखने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले होते. आपल्या आयुष्यातील एका खास व्यक्तीसाठी शाहरुख चित्रपटापासून लांब राहिल्याचे त्याने या मुलाखतीत सांगितले. त्यामुळे शाहरुखच्या आयुष्यातील ही खास व्यक्ती कोण, याच्या चर्चा रंगायला लागल्या. पण, शाहरुखनेच हा संभ्रम दूर केला आहे.
शाहरुखची मुलगी शिकायला परदेशात होती. तेव्हा अनेकदा तिला एकटे वाटायचे. ती फोन करून सांगायची, पण चित्रपटाचे शूटिंग अर्ध्यात सोडून मला काही तिला भेटायला जाणे शक्य होत नसे. अशावेळी माझी बायको गाैरी लंडनला जायची. माझ्या मुलांना मी कधीच वेळ देऊ शकलो नव्हतो. याची जाणीव झाल्यानंतर मी कामातून ब्रेक घ्यायचा ठरवलं. मग मात्र, माझी मुलगी कधी फोन करेल, आणि मी कधी तिला भेटायला जाईन, असे मला होत असे. मी नेहमी तिच्या फोनची वाट बघायचो, पण तिने या काळात कधीही मला एकटे वाटत आहे किंवा तुम्ही या म्हणून फोनच केला नाही. मग एक दिवस मीच तिला फोन करून, तू मला फोन का करत नाहीस, अशी विचारणा केली. यावर माझी मुलगी सहाना म्हणाली की, मी इथे खूप खुश आहे. तुम्ही इकडे येऊ नका. माझ्या मुलीने देखील मला मी काम न करण्याचे कारण विचारले. तिला कारण कळताच ती म्हणाली की, तुम्ही काम करा मी इकडे खुश आहे. माझी काळजी करू नका. शाहरुखने नुकतेच त्याच्या ‘डंकी’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असून याचा एक व्हिडीओ शाहरुखने सोशल मीडियावर शेअर केला होता.
Bollywood Actor Shahrukh Khan New Film