India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सेल्फी चित्रपट जोरदार आपटल्यानंतर अक्षय कुमार म्हणाला…

India Darpan by India Darpan
March 6, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या नावावर अनेक सुपरहिट चित्रपट आहेत. अक्षय या इंडस्ट्रीत आला तेव्हा सुरुवातीच्या काळात त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप गेले होते. त्यानंतर त्याने कामबॅक केले. आणि मग त्याचे चित्रपट हिट जाऊ लागले. त्याच्यातील अभिनय कौशल्याला प्रेक्षकांनी दाद दिली. आणि त्याच्या नावावर अनेक हिट चित्रपट जमा झाले. यासोबतच वेगळ्या विषयाचे, धाटणीचे चित्रपट देण्यासाठी देखील अक्षय ओळखला जातो.

अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर अक्षय पुन्हा एकदा फ्लॉप चित्रपटांच्या गर्तेत सापडला आहे. गेल्यावर्षी त्याचे सलग चार चित्रपट फ्लॉप गेले आहेत. तर यावर्षी आलेला त्याचा पहिला चित्रपटही फ्लॉप झाला आहे. सलग पाच चित्रपट फ्लॉप दिल्यानंतर आता अक्षय म्हणतो की, माझे चित्रपट फ्लॉप गेले यात प्रेक्षकांचा काहीच दोष नाही तर मी स्वतःच प्रेक्षकांना ओळखायला कमी पडलो आहे.

अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने उलथापालथ केली. जवळपास १५० कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाची पहिल्याच दिवशी अत्यंत खराब कामगिरी होती. दुसऱ्या दिवशीही चित्रपटाची स्थिती जवळपास तशीच होती. गेल्या वर्षी सलग चार फ्लॉप देणारा अक्षय कुमारचा या वर्षी प्रदर्शित झालेला हा पहिला चित्रपट आहे आणि तोही फ्लॉप ठरला. यामुळे अक्षयच्या खात्यात सलग पाचव्या फ्लॉपची भर पडली आहे. या फ्लॉप चित्रपटाबाबत अक्षय कुमारने नुकतेच मौन सोडले आहे.

अक्षय कुमार म्हणतो की, हे माझ्यासोबत पहिल्यांदाच घडत नाही. जेव्हा तुम्ही चूक करता तेव्हा असे घडते. आपल्या चित्रपटांच्या फ्लॉपची जबाबदारी अक्षय कुमारने घेतली आहे. तो म्हणाला की, प्रेक्षकांची आवड बदलते आहे. मी ते समजून घेण्यात कमी पडलो आहे. त्याचा विचार करणे मला गरजेचे आहे.

मी बॉलीवूडमध्ये आलो तेव्हा माझे सलग १६ चित्रपट फ्लॉप गेले. त्यानंतर मधल्या काळात सलग आठ चित्रपट फ्लॉप झाले. अ‍ॅक्शन चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्याबाबत अक्षय कुमार म्हणाला, ‘माझ्या चाहत्यांना माझ्यात बदल हवा आहे आणि मी बदलणार आहे.
अक्षय कुमारच्या ‘सेल्फी’ चित्रपटात इमरान हाश्मीही आहे. हा चित्रपट एका सुपरस्टार आणि एका चाहत्याच्या कथेवर आधारित आहे. ‘सेल्फी’ हा साउथचा सुपरहिट चित्रपट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’चा रिमेक आहे. पहिल्या दिवशी ‘सेल्फी’ने २.५५ कोटी रुपये कमवले. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने थोड्या वाढीसह ३.३० कोटींची कमाई केली.

Bollywood Actor Akshay Kumar on Selfie Movie Flop


Previous Post

पन्नासाव्या वर्षी ‘तारक मेहता’चे दुसरे लग्न; अभिनेता सचिन श्रॉफ चर्चेत

Next Post

उद्धव ठाकरेंच्या सभेवर एकनाथ शिंदे यांनी दिली ही प्रतिक्रीया.. (व्हिडिओ)

Next Post

उद्धव ठाकरेंच्या सभेवर एकनाथ शिंदे यांनी दिली ही प्रतिक्रीया.. (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023

चिपळूण-कराड रेल्वे मार्ग प्रकल्पाचे घोडे नेमके कुठे अडले? राज्य सरकार म्हणाले

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group