मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) नेटवर्क उघडकीस आले आहे. याप्रकरणी कुर्ला येथील एका कंपनीच्या संचालकाला जीएसटी फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सीजीएसटी मुंबई पूर्व आयुक्तालयाच्या कर चोरी विरोधी पथकाच्या अधिकार्यांनी ही कारवाई केली आहे.
मुंबई झोनच्या केंद्रीय गुप्तचर पथकाकडून मिळालेल्या माहिती वरुन कारवाई करत, मेसर्स लक्षिन मेटल्स प्रा. लि. विरुद्ध तपास सुरू करण्यात आला. ज्याने सीजीएसटी कायदा, 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन करून, 15.26 कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवले आणि वस्तूंची वास्तविक पावती किंवा पुरवठा न करता ते दिले गेले. या फसवणुकीसाठी, सुमारे 15 संस्थाची एक जाळी तयार केली आणि रु. 84 कोटी पेक्षा जास्त रकमेच्या बोगस पावत्या निर्गमित करण्यात आल्या.
तपासादरम्यान, या कंपनीच्या संचालकाचे जबाब नोंदवला गेला, ज्यामध्ये त्याने या जीएसटी फसवणुकीत आपली भूमिका मान्य केली. सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल दिनांक 19 मे रोजी त्याला सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत अटक करण्यात आली. न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
केंद्रीय गुप्तचर पथकाचे अधिकारी संभाव्य फसवणूक करणार्यांना ओळखण्यासाठी डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषणाची साधने वापरत आहेत आणि तपासासाठी संबंधित क्षेत्रीय आयुक्तालयां कडे तपशील सामायिक करत आहेत. हे प्रकरण सीजीएसटी मुंबई झोनने फसवणूक करणारे आणि बनावट आईटीसी नेटवर्क डीलर्स विरुद्ध सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग आहे, जे प्रामाणिक करदात्यांना मोठी स्पर्धा निर्माण करत आहेत. 2021-22 या आर्थिक वर्षात, सीजीएसटी मुंबई पूर्व आयुक्तालयाने रु 1002 कोटी ची जीएसटी चोरी शोधली आणि 124 कोटी रुपये वसूल केले. तसेच कर चोरी करणाऱ्या दोघांना अटक केली.