India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

भाजप नेते किरीट सोमय्यांच्या कार्यालयातच घोटाळा; असे झाले उघड

इतरांचे घोटाळे काढणाऱ्यांवरच ओढवले संकट

India Darpan by India Darpan
March 4, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विरोधी पक्षातील दिग्गजांचे घोटाळे बाहेर काढून राजकीय वातावरण कायम गरम ठेवणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या कार्यालयातच घोटाळा झाल्याची माहिती पुढे आली आहे.

सोमय्या यांच्या मुलुंड (पूर्व) कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी ‘ऐका स्वाभिमानाने’ उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या श्रवणयंत्र वाटपातील जवळपास साडेसात लाखांच्या मशीनचा परस्पर अपहार केला आहे. ही बाब कार्यालय प्रमुख प्रफुल्ल कदम यांच्या लक्षात आली. त्यानुसार त्यांनी नवघर पोलिस स्टेशन येथे तक्रार केली असून या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. २०१७-१८ पासून संस्थेमार्फत ‘ऐका स्वाभिमानाने’ या उपक्रमांतर्गत कानाचे मशीन (श्रवणयंत्र) ५०० रुपये दराने ज्येष्ठ नागरिकांना दिले जातात. कॅम्पचे आयोजन करून मशीनचे वाटप होते.

कार्यालयातील प्रज्ञा जयंत गायकवाड (३७) आणि श्रीकांत रमेश गावित (३६) यांची प्रकल्पप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. गायकवाड आणि गावित त्याचा हिशोब कदम यांना देतात. मिळालेली रक्कम बँकेत जमा केली जाते. काही दिवसांपूर्वी कदम यांनी प्रज्ञा यांच्याकडे किती मशीन शिल्लक आहे? याबाबत विचारले. त्यांनी सर्व मशीनचे वाटप झाल्याचे सांगितले. मात्र, त्यांना संशय आल्याने त्यांनी तपासणी केली. तेव्हा १ हजार ४७२ मशीनची जवळपास ७ लाख ३६ रुपयांची तफावत आढळली. दोघांकडे जाब विचारताच त्यांनी अपहार केल्याची कबुली दिली आहे.

BJP Leader Kirit Sommaiyya Office Scam Crime


Previous Post

रुग्णवाहिका बंद पडल्याने माजी आमदाराचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेचे पितळ पुन्हा उघड

Next Post

‘आता आम्हाला इच्छामरण तरी द्या!’, संकटग्रस्त कांदा उत्पादकांची राष्ट्रपतींकडे मागणी

Next Post

'आता आम्हाला इच्छामरण तरी द्या!', संकटग्रस्त कांदा उत्पादकांची राष्ट्रपतींकडे मागणी

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group