मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्षाने संघटनेत महत्त्वाचे बदल केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपने राज्यातील ३६ जिल्ह्यात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमध्ये मात्र नाशिक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांची नियुक्ती नाही. नाशिक शहर, उत्तर व दक्षिण असे तीन जिल्हाध्यक्षांची पदे आहे. त्यात प्रचंड रस्सीखेच असल्यामुळे तूर्तास ही नियुक्ती करण्यात आली नाही.


