नाशिक – बेटी बचाव बेटी पढाव अभियानांतर्गत भाजप प्रदेशाकडून वकृत्व स्पर्धेचे आयोजन २४ जानेवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातून प्रथम पुरस्कार २१ हजार रुपये द्वितीय पुरस्कार ११ हजार व तृतीय पुरस्कार ७ हजार आहेत. तसेच आपल्या जिल्ह्यातून देखील प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक देण्यात येतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाच्या प्रदेश संयोजक डॉ. शुभा पाध्ये आणि उत्तर महाराष्ट्राच्या प्रभारी सौ. सोनल दगडे कासलीवाल यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात शाळा-कॉलेज व सामाजिक संस्थान करिता आयोजित केला आहे. तीन ते पाच मिनिटाचा व्हिडिओ मराठी, हिंदी ,इंग्लिश ज्या भाषेवर प्रभुत्व आहे त्या भाषेत व्हिडिओ काढून दिलेल्या साइटवर अपलोड करायचा आहे यासाठी विषय आहेत
१- आजची पिढी तंत्रस्नेही पिढी
२ – विचार मंथन मुलीचे लग्नाचे वय २१
३- सृजन करते मी तरीही अजून असुरक्षित मी
४- भारतीय नारी आत्मनिर्भर नारी
५ – मुलगी देशाची शान प्रत्येक घराचा सन्मान
यासाठी १६ ते २५ वयोगटातील मुलामुलींसाठी प्रवेश खुला आहे ई-मेल – competition.bbbp@gmail.com या email- id वर आपला व्हिडिओ पाठवावा , असे आवाहन प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी सौ सोनल दगडे कासलीवाल व पदाधिकारी यांनी केले आहे अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ. अरुण देशपांडे- 9923257639,
मोनालिसा जैन- 992402831 ,
मंजुषा पहाड़े- 9226168739 मयुरी पवार- 7720005388
गीता श्यामसुका – 9923286789