मुंबई – कोविडच्या नावाने मेडिकल इमर्जन्सीच्या अधिकाराचा राक्षसी भ्रष्ट वापर याचे जगातले सगळ्यात मोठे उदाहरण मुंबई महानगरपालिका आहे असे भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांनी सांगितले. कोविडचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याची स्पर्धा शिवसेना नेते व मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरु होती. याचे एक उदाहरण आज मुंबईत भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांनी दिले.
मुंबई महानगरपालिकेचे वॉर्ड अधिकारी सहाय्यक आयुक्त मनिष राधाकृष्ण वळंजू यांनी सुमारे रु. १०० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट आपल्या/वडिलांच्या व मित्र परिवाराच्या कंपन्यांमध्ये मिळविले.
• मनिष राधाकृष्ण वळंजू हे एल वॉर्ड (कुर्ला) चे सहाय्यक आयुक्त होते, सध्या ते ई वॉर्ड (भायखळा) येथे सहाय्यक महापालिका आयुक्त आहेत.
• मनिष यांचे वडिल राधाकृष्ण बाळकृष्ण वळंजू, वय ७० वर्षे यांनी २१ ऑगस्ट २०२० रोजी Genehealth Diagnostics Pvt. Ltd. कंपनीची स्थापना केली.
• अवघ्या काही दिवसात मुंबई महानगरपालिकेनी बघता-बघता त्यांना ३० कोटीहून अधिक रक्कमेचे ऑर्डर टेंडर दिले. आरटीपीसीआर, कोविड टेस्टिंग हे काम नवीन जन्माला आलेल्या कंपनीला दिले.
• राधाकृष्ण वळंजू यांचा कोणताही फारसा व्यवसाय नाही, अनुभव नाही, वैद्यकीय तज्ञ नाही, आर्थिक/कंपन्या चालवण्याचा अनुभव नाही.
• १८ जून २०२१ रोजी मनिष वळंजू मित्र परिवाराने Genecy Diagnostics LLP कंपनीची स्थापना केली. या कंपनीला ही काही दिवसातच महापालिकेचे कोविडचे मोठे-मोठे ऑर्डर्स मिळायला लागले.
• बहुतेक टेंडर अँटिजन टेस्ट, आरटीपीसीआर, स्वॅब टेस्ट….. अशा पद्धतीचे
आरटीपीसीआर, अँटिजन या टेस्टिंगचे मोठ्याप्रमाणात महानगरपालिकेचे ऑर्डर अशाच पद्धतीने महापालिकेचे अधिकारी व सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या मित्र परिवारांच्या कंपन्यांना दिले गेले असल्याचे भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांनी सांगितले. महापालिकेने मनिष वळंजूच्या Genehealth Diagnostics Pvt. Ltd. कंपनीला दिलेल्या ३३.९७ कोटी रुपयांची माहिती सोबत भाजपा नेते डॉ. सोमैया यांनी दिली आहे.
अशा प्रकारच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टची चौकशी करण्याची मागणी भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांनी केली आहे. मनिष वळंजू संबंधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार ही दिली आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकारी व शिवसेनेसाठी कोविड काळ म्हणजे पैसे कमविण्याची संधी हे यातून सिद्ध होत आहे.