मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बिटकॉइन ही जगातील सर्वात जुनी आणि सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे. किशोरवयात म्हणजे 14 वर्षांत प्रवेश करणारी पहिली क्रिप्टोकरन्सी बनली आहे. बिटकॉइनला 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. क्रिप्टोकरन्सी हा एक डिजिटल चलन (अॅसेट) असून ते वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी वापरले जाते. गेल्या १३ वर्षात नक्की काय झाले, गुंतवणूकदारांना फायदा झाला की तोटा हे आज आपण जाणून घेणार आहोत…
या चलनात क्रिप्टोग्राफी वापरली जाते. आपण ते प्रॉपर्टी म्हणून वापरू शकतो, परंतु यासाठी बँक, एटीएम असे काही नसते. जगातील बऱ्याच देशांमध्ये क्रिप्टोकरन्सी ऑनलाईन शॉपिंगमध्ये वापरली जाते. प्रत्येक देशाचे स्वतःचे एक चलन असते. उदा. भारताचे चलन रुपया आहे. इतर देशांकडेही त्यांचे स्वतःचे एक चलन आहे. परंतु क्रिप्टोकरन्सी हे आभासी चलन आहे. ते नोटा किंवा नाणी स्वरुपात छापता येत नाही, तरीही त्याला मूल्य आहे.
क्रिप्टोकरन्सीची सुरुवात 2009 मध्ये झाली. बिटकॉइन ही जगातील सर्वांत मोठी क्रिप्टोकरन्सी असून तिच्यामुळेच क्रिप्टोकरन्सी जगाला माहित झाली. जपानमधील सतोशी नाकामोटो नावाच्या इंजिनीअरने बिटकॉइनची निर्मिती केली. जगभरात सुमारे 1 हजार हून अधिक क्रिप्टोकरन्सीज आहेत.
विशेष म्हणजे बिटकॉइन श्वेतपत्रिका सतोशी नाकामोटो यांनी दि. 28 ऑक्टोबर 2008 रोजी प्रसिद्ध केली असली तरी, मिंट तारीख 3 जानेवारी 2009 आहे, त्यामुळे नागरिक दि. 3 जानेवारी हा त्यांचा वाढदिवस मानतात. बिटकॉइनने जगभरातील क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेनच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
बिटकॉइनचे निर्माते नाकामोटो यांनी दि. 3 जानेवारी रोजी बिटकॉइनचा मूळ ब्लॉक प्रसिद्ध केला, सध्या जेनेसिस ब्लॉक म्हणून तो ओळखला जातो. त्यात पहिले 50 बिटकॉइन्स इंडिया ब्लॉकचेन अलायन्सचे संस्थापक राज कपूर यांच्या बरोबर पहिला व्यवहार मे 2009 मध्ये झाला होता.
बिटकॉइनचा 13 वर्षांचा प्रवास अतिशय अस्थिर होता. बिटकॉइनबद्दल काही कडक टीकाकार आणि काही समर्थक होते. एकूणच, बिटकॉइनसाठी आतापर्यंतचा प्रवास खूपच रोमांचक राहिला आहे. मात्र हे चलन आजही आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहे. परंतुआता बिटकॉइनवर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे.
बिटकॉइनने सुरुवातीपासून किती परतावा दिला आहे हे मोजणे थोडे कठीण आहे, कारण ते सादर केले गेले, तेव्हा त्याची किंमत शून्य होती. जुलै 2010 मध्ये, त्याची किंमत 0.09 डॉलर्स पर्यंत घसरली आणि नोव्हेंबर 2021 मध्ये ती 68,790 रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचली.
बिटकॉइनने गेल्या 13 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड मोठा परतावा दिला आहे. त्याने 7,64,33,233 चा अविश्वसनीय परतावा दिला आहे. म्हणजेच, जर एखाद्या गुंतवणूकदाराने सुरुवातीला 1000 रुपये गुंतवले असतील तर नोव्हेंबर 2021 मध्ये ही रक्कम 76.43 कोटी रुपये झाली असती.