मुंबई – मोबाईल बाजारात ढिगभर स्मार्टफोन उपलब्ध आहेत. परंतु फोल्डेबल फोनचा वेगळाच स्वॅग आहे. फोल्डेबल फोनची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ग्राहकांची ही क्रेझ भापून अनेक स्मार्टफोन कंपन्या आपले उत्पादन सादर करण्यासाठी सज्ज आहेत. या सेंगमेंटमध्ये आधीपासूनच सॅमसंग, मोटो आणि हुवावेचे मोबाईल डिव्हाइस उपलब्ध आहेत. आता ओप्पोने आपल्या फोल्डेबल फोनचे अनावरण करण्याची घोषणा केली आहे. फोल्डेबल फोन खरेदी करण्याची कोणाला इच्छा नसेल बरे? परंतु तो महाग असल्याने अनेकांना खरेदी करता येत नाही.
निम्म्या किमतीत
फोल्डेबल फोन बाळगण्याची तुम्हाला इच्छा आहे, परंतु महागडा असल्याने तुम्ही तो खरेदी करू शकत नसाल. तर तुमचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. एक मस्त फोल्डेबल स्मार्टफोन निम्म्या किमतीत मिळत आहे. तर चला मग जाणून घेऊया या फोनबद्दल…
मोटोरोला कंपनीचा Motorola Razr 5G हा फोल्डेबल फोन ई-कॉमर्स कंपनीच्या निम्म्या किमतीत उपलब्ध आहे. मोटोरोला रेजर ५ जी या फोनची वास्तविक किंमत १.५० लाख रुपये आहे. परंतु तो फ्लिपकार्टवर ४० टक्के म्हणजेच ८९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. पण ही ऑफर येथेच संपत नाहीये. या फोनवर तुम्ही पूर्ण १५,४५० रुपयांचा एक्सचेंज बोनसचा लाभही घेऊ शकणार आहात. तसेच फोनवर तुम्हाला अनेक बँकांच्या कार्डची ऑफर मिळत आहे. हा फोन तुम्ही ३,०७६ प्रति महिन्याच्या हफ्त्यावर घेऊ शकता.
फोनची वैशिष्ट्ये
हा ५जी फोल्डेबल फोन एकमेव 8GB+256GB व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. अनफोल्ड झाल्यावर फोनमध्ये ६.२ इंचाचा एचडी प्लस AMOLED डिस्प्ले मिळेल. फोल्ड झाल्यावरही फोनमध्ये २.७ इंचाचा क्विक व्ह्यू डिस्प्ले आहे. त्यामध्ये कॉल आणि नोटिफिकेशनची माहिती मिळते. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७५६ जी प्रोसेसरचे काम करते. फोटोग्राफीसाठी यामध्ये ४८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि २० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. रिअर कॅमेर्याला तुम्ही ड्युअल कॅमेरा म्हणूनही वापर करू शकता.
(नोट – एक्सचेंज बोनसची रक्कम तुमच्या जुन्या फोनच्या परिस्थितीवर आणि मॉडेलवर अवलंबून असेल. म्हणजेच तुम्हाला पूर्ण एक्सचेंज बोनसचा लाभ मिळाला तर फोनची किंमत मात्र ७४,४५९ रुपये म्हणजेच निम्म्याहून कमी होईल. फ्लिपकार्टवर ही ऑफर फोनच्या Polished Graphite रंगावर मिळत आहे.)