मुंबई ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनेक उच्चशिक्षित तरुण बेरोजगार असून शासकीय नोकरीची संधी शोधत आहेत. त्याकरिता वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देखील देत आहेत. त्यातच बँकेमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होते का याचा देखील तरुण शोध घेत असतात. बँक नोकऱ्यांसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने जनरलिस्ट ऑफिसरच्या 500 रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती स्केल-II आणि स्केल-III साठी आहे. या भरतीसाठी अर्जाची सर्व प्रक्रिया ऑनलाइन केली जाईल. या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे पात्र आणि इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in द्वारे अर्ज करू शकतात.
बँक ऑफ महाराष्ट्र भरतीसाठी अर्ज प्रक्रिया दि. 5 फेब्रुवारी 2022 पासून सुरू झाली आहे. भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2022 निश्चित करण्यात आली आहे. शेवटच्या क्षणी तांत्रिक समस्या टाळण्यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
बँक ऑफ महाराष्ट्र जनरलिस्ट ऑफिसर स्केल-II साठी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 60 टक्के गुणांसह पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून CA/ICWA/CFA/FRM असणे आवश्यक आहे. याशिवाय अर्जदाराला पदवीनंतर संबंधित क्षेत्रातील 3 वर्षांचा अनुभव असावा. अर्जदारांची किमान वयोमर्यादा 25 वर्षे आणि कमाल 35 वर्षे आहे.
जनरलिस्ट ऑफिसर स्केल-III साठी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 60 टक्के गुणांसह पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून CA/ICWA/CFA/FRM असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, पदवीनंतर, उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील 5 वर्षांचा अनुभव देखील असावा. अर्जदारांची किमान वयोमर्यादा 25 वर्षे आणि कमाल 38 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
पदांचा तपशील असा
A ) जनरलिस्ट ऑफिसर स्केल-II साठी पदांची संख्या – 400
वेतनमान- 48,170 ते 69,810 रुपये
B ) जनरलिस्ट ऑफिसर स्केल-III साठी पदांची संख्या – 500
वेतनमान – 63,840 ते 78,230 रुपये
उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. ही परीक्षा दि. 12 मार्च 2022 रोजी होणार आहे. भरतीसाठी अर्ज करणार्या उमेदवारांना अर्ज शुल्क देखील जमा करावे लागेल. अर्ज शुल्क श्रेणीनुसार सेट केले आहे. हे खालीलप्रमाणे आहेत.
1. सामान्य, EWS आणि OBC श्रेणीसाठी – 1180 रुपये. 2. अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी – 118 रुपये. 3. दिव्यांग आणि महिला वर्गासाठी – कोणतेही शुल्क नाही.
असा करा अर्ज
1. उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in ला भेट द्या.
2. आता मेन पेजवर (मुख्यपृष्ठावर) दिसणार्या करिअर विभागात जा.
3. आता संबंधित भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
4. आता आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
5. आता अर्ज फी भरा आणि सबमिट करा.
6. अर्ज डाउनलोड करा आणि पुढील आवश्यकतेसाठी त्याची प्रिंट आउट घ्या.